खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

साईबाबा मंदिरात २७ सप्टेंबरपासून रंगणार कीर्तन महोत्सव सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील वाघ बिल्डिंग जवळील साईबाबा मंदिरात दि. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात रोज कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
यात दि.२७ रोजी ह.भ.प.विवेक सिसोदे महाराज वेलेकर, दि.२८ रोजी विजय भामरे महाराज(खंजेकर), २९ रोजी श्री राज महाराज (कंचनपूरकर), दि ३० रोजी दिनेश महाराज (कंचनपूरकर) तर दि.१ ऑक्टोरबर रोजी मुकेश महाराज पारगावकर दि.२ ऑक्टोम्बर रोजी महंत प्रा.सुशिल महाराज (एम फार्मसी,विटनेरकर ) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम साईबाबा पुण्यतिथी महोत्सव समिती अमळनेरतर्फे रात्री ८:३० ते १०:३० पर्येंत आयोजित करण्यात आला आहे. या वेळी पंचक्रोशीतील वारकरी संप्रयदायातील गायनाचार्य ह.भ.प.निंबाजी महाराज हातेडकर, भरत महाराज, रवींद्र महाराज, मृदुंगाचार्ये दीपक महाराज, हार्मोनियम वादक भैया महाराज, विणाचार्य पंढरीनाथ महाराज, राजेंद्र महाराज तसेच टाळकरी साथ संगत ह.भ.प.अंबादास चौधरी, देवा महाराज, मधुकर गुरुजी, बाळू महाराज वसंत महाराज सर्व अमळनेर नामदेव महाराज,(पाळधी)भिका महाराज (पैलाड) आणि स्वर साधना नितीन महाजन अमळनेर माऊली भजनी मंडळ (हातेड) ज्ञानेश्वर भजनी मंडळ (अमळनेर)आदींचा कीर्तन महोत्सवात साथ सहभाग राहणार आहेत, असे साईबाबा पुण्यतिथी महोत्सव समिती तर्फे प्रवीण बी.महाजन यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button