खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शासकीय प्रशासक म्हणून सहकार अधिकारी व्ही. एम. जगताप यांची वर्णी

अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर तालुका शेतकी संघावर नियुक्त केलेले अशासकीय प्रशासकांची नियुक्ती रद्द करून पुन्हा शासकीय प्रशासकाची नियुक्ती केली आहे. यात शासकीय प्रशासक म्हणून सहकार अधिकारी व्ही. एम. जगताप यांची नियुक्ती केली आहे.
पणन संचालकांच्या आदेशानुसार सहाययक निबंधकांनी ही नियुक्ती केली आहे.
अमळनेर तालुका शेतकी संघाची मुदत गेल्या काही वर्षांपासून संपली असल्याने शेतकी संघावर जी एस महाजन यांची शासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक घेण्यास संघाची आर्थिक परिस्थिती नसल्याने शासकीय प्रशासकाला वारंवार मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार च्या काळात अशासकीय प्रशासक नियुक्त करण्यात आले.मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील , व प्रशासक म्हणून भाईदास सुखदेव महाजन , भरतसिंग धनसिंग पाटील , रवींद्र कौतिक पाटील , उमाकांत दिनकर पाटील ,धनराज पितांबर पवार , संजय भिला पाटील ,सुधाकर यशवंत धनगर , सुरेश पिरन पाटील , अलीम हकीम मुजावर , महेश प्रभाकर देशमुख , ज्ञानेश्वर गंगाराम पाटील ,मंगलसिंग बळीराम सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पणन संचालकांच्या आदेशाने सहाययक निबंधक किशोर पाटील यांनी अशासकीय प्रशासकाची नियुक्ती रद्द करण्यात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button