खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

ग्राहक म्हणून आलेल्या चोरटय़ाने दुकानातील गल्ल्यावर मारला डल्ला

दुकानदाराच्या सतर्कतेने चोरटय़ाचा पाठलाग करून केले जेरबंद

अमळनेर (प्रतिनिधी) ग्राहक म्हणून आलेल्या चोरटय़ाला गल्ल्यातून डल्ला मारताना दुकानदाराने पकडून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना शहरातील ऑटो पार्टसच्या दुकानात घडली.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, हुजेफा मोहम्मद इजी यांचे न्यू प्लॉट एचडीएफसी बँकेजवळ मोहम्मदी ऑटो पार्टस नावाचे दुकान आहे. दि 15 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास भिकन दशरथ कोळी (रा.अमळगाव) हा ग्राहक बनून गाडीचे ऑइल घेण्यासाठी आला. यावेळी ते ऑइल घेण्यासाठी आता गेले असता परत येताना कोळी हा समोरील गल्ल्यात हात टाकून रक्कम काढताना दिसला. त्याच वेळी हुजेफा यांनी त्याचा हात धरला असता त्याने त्यांच्या हाताला झटका देत 3650 रुपये घेऊन पळ काढला. त्यांनी लगेच चोर चोर करीत त्याचा पाठलाग केला असता दुकानाचा कारागीर सूरज पाटील तसेच अकील शाह, प्रतीक शाह व अजीज बोहरी यांनी त्यास पळत जाऊन पकडले. त्यानंतर त्याचे नाव गाव विचारून पोलिसांना त्याठिकाणी बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याकडून लांबविलेली रक्कम जप्त करून त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.दरम्यान सदर चोरट्याने यापूर्वी देखील शहरातील दुकानातून याद्धतीने चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button