खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शाळा अन् महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

हॉकीचे जादुगार मेजर ध्यनचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले अभिवादन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाळा, महाविद्यालयांध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादुगार मेजर ध्यनचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले. तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

स्वामी विवेकानंद सी.बी.एस. ई. स्कूल

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल सी.बी.एस. ई. स्कूल येथे स्थापन केलेल्या शालेय विद्यार्थी मंत्रिमंडाळाच्या विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून ४९ एन.सी.सी बटालियन, अमळनेर सुभेदार धरमबीर सिंग, सुभेदार जसबिर सिंग तसेच पोलिस निरीक्षक जयपाल हिरे संस्थेचे मार्गदर्शक बजरंग अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष नीरज अग्रवाल, ममता अग्रवाल, मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे व पालक उपस्थित होते.
पदप्रदान समारंभात पद व त्या नावाचे बॅचेस पालकांच्या हस्ते लावून विद्यार्थी प्रमुखांना गौरविण्यात आले. यात शालेय विद्यार्थी प्रमुख आयुष पाटील तसेच विद्यार्थिनी प्रमुख कीर्ती पाटील या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना जबाबदारी देण्यात आली. तर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना हाऊसनुसार प्रमुख पदे देण्यात आली. सूत्रसंचालन राहुल शिरसाठ तसेच सीमा पाटील यांनी केले.

हाऊसनुसार विद्यार्थी प्रमुख असे

पृथ्वी हाऊस प्रमुख हिमांशू पांडव, आर्या हिरे, आकाश हाऊस प्रमुख विराज साळुंखे, उत्कर्षा पाटील. अग्नि हाऊस प्रमुख दीपदर्शन पाटील, नक्षत्रा माळी, त्रिशूल हाऊस प्रमुख नमित जैन, रिद्धी जैन आहेत. त्याचप्रमाणे क्रीडा प्रमुख मोहन पाटील, शालेय शिस्त प्रमुख परिणीता जाधव, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्रद्धा पाटील, ग्रंथालय प्रमुख आरती कुमारी प्रजापती या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा शपथविधी समारंभ पार पडला. मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे यांनी शपथविधी घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

विद्यार्थ्यांनी साकारल्या खेळाडूंच्या वेशभूषा

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर धरमवीर सिंग व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हस्ते मेजर ध्यानचंदजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद, पी. टी. उषा, मिलखा सिंग, सानिया नेहवाल, सानिया मिर्झा, पी. व्ही. सिंधू, सचिन तेंडुलकर यांची वेशभूषा साकारून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुण्यांसह मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे यांनी खेळाचे महत्व पटवून दिले

जिमखान्यात झाली बॅडमिंटन, टेबल टेनिस स्पर्धा

अमळनेर येथील कनिष्ठ व वरिष्ठ जिमखाना विभागाच्या वतिने ईनडोर हॉलमध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी १०० खेळाडू सहभागी होते. या क्रीडा दिनाच्या निमित्ताने बॅडमिंटन, टेबल टेनिस स्पर्धा घेण्यात आल्या.
खा.शी.मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन केले. संचालक डॉ.अनिल शिंदे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. या वेळी उपप्राचार्य प्रा.उल्हास मोरे, डॉ.डी.आर.चौधरी, प्रा.सुनिल पाटील, डॉ.रवी बाळसकर, जगदीश शिंगाने उपस्थित होते. या कार्यक्रमास प्र.प्राचार्य डॉ.पी.आर.शिरोडे, डॉ. जयेश गुजराथी यांनी सहकार्य केले. जिमखाना विभागाचे अध्यक्ष डॉ.विजय तुंटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा.अमृत अग्रवाल यांनी केले. आभार वरिष्ठ क्रीडा संचालक प्रा.सचिन पाटील यांनी मानले.

देवगांव देवळी हायस्कूल

तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा झाल्या. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इयत्ता आठवी नववी दहावीतील विद्यार्थ्यांनी कबड्डी, रस्सीखेच, लिंबू चमचा, संगीत खुर्ची ,गोणपाट स्पर्धौ घेण्यात आल्या. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षिसे दिले जाणार आहेत. या वेळी स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व एन.जी.देशमुख यांनी केले.
क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेसाठी सांस्कृतिक प्रतिनिधी आय. आर. महाजन, स्काऊट शिक्षक एस. के महाजन, एच. ओ. माळी. शिक्षकेतर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजी पाटील गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button