खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 🔷 पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडीयम :-

◆ जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन गुजरातच्या अहमदाबादमध्ये (मोटेरा येथे) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 24 फेब्रुवारी 2021 रोजी केले.

◆ सरदार पटेल स्टेडीयम असे नाव असलेल्या या स्टेडीयमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे.

◆ जगातील सर्वांत मोठे स्टेडीयम म्हणून मान असलेल्या ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडची जागा आता नरेंद्र मोदी स्टेडीयमने घेतली आहे.

◆ जगातील सर्व क्रीडा प्रकारातील स्टेडीयमचा विचार केल्यास हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे स्टेडीयम ठरले आहे.

🔶 या स्टेडीयमची वैशिष्ट्ये :-

◆ सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हमध्ये हे स्टेडीयम आहे.

◆ क्षेत्रफळ 63 एकर (स्टेडियमचे एकूण क्षेत्रफळ 32 ऑलिंपिक आकाराच्या सॉकर फील्ड्स एवढे आहे.)

◆ आसन क्षमता :- 1 लाख 32 हजार

◆ स्टेडियममध्ये 76 एसी कॉर्पोरेट बॉक्स आहेत. स्टेडियम उभारण्यासाठी जवळपास 700 कोटी रुपयांचा खर्च आला.

◆ मैदानात 11 खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये लाल, काळ्या मातीने तयार केलेल्या खेळपट्ट्यांचा समावेश आहे. एकाच वेळी चार ड्रेसिंग रूम असलेले जगातले हे पहिले स्टेडियम आहे.

◆ उद्घाटनानंतर भारत आणि इंग्लंड दरम्यान डे नाईट कसोटी सामना पार पडला. डे नाइट सामना LED लाइटमध्ये खेळवण्यात आलेले हे देशातील पहिले स्टेडियम आहे.

: 🔷 भारतातील पहिले महिलांच्या मालकीचे औद्योगिक उद्यान :-

◆ 08 मार्च 2022 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने भारतातील पहिले 100 टक्के महिलांच्या मालकीचे औद्योगिक उद्यान (Industrial Park) हैदराबाद, तेलंगणा येथे उघडण्यात आले.

◆ 25 महिलांच्या मालकीच्या आणि संचालित हरित प्रकल्पांसह, या औद्योगिक उद्यानाने त्याचे कार्य सुरू केले आहे.

◆ FLO इंडस्ट्रियल पार्कचे नाव FICCI लेडीज ऑर्गनायझेशन (FLO) च्या नावावर देण्यात आले आहे. FLO इंडस्ट्रियल पार्क 50 एकरवर पसरले आहे आणि हे बांधण्यासाठी 250 कोटी रुपये खर्च आला आहे.

◆ या उद्यानाने कामगार महिला उद्योजकांच्या गरजा लक्षात घेऊन महिलांसाठी घरासारखे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पाळणाघरे आणि प्लेस्कूल यासारख्या सुविधांची स्थापना केली आहे.

: 🔷 छत्तीसगडमध्ये सर्वात कमी बेरोजगारी :-

◆ सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीद्वारे (CMIE) 05 एप्रिल 2022 रोजी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार छत्तीसगड देशातील सर्वात कमी बेरोजगारीचा दर असलेल्या राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी 2022 मधील 8.10 टक्क्यांवरून 7.6 टक्के (मार्च 2022) पर्यंत कमी झाला आहे.

◆ आकडेवारीनुसार, हरियाणात सर्वाधिक 26.7% बेरोजगारी दर आहे.

: 1) प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?
👉 १७५७ (23 जून 1757)

2) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली ?
👉 राजा राममोहन रॉय

3) “वेदाकडे परत चला” असा उपदेश कोणी दिला ?
👉 स्वा.दयानंद सरस्वती

4) प.रमाबाईंच्या “शारदा सदन” ची स्थापना कधी केली ?
👉 ११ मार्च १८८९

5) SNDT विद्यापीठ मुंबई ची स्थापना कोणी केली ?
👉 म. धो.के कर्वे

6) कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?
👉 नारायण मेघाजी लोखंडे

7) “डिस्प्रेड क्लासेस मिशनची” स्थापना कोणी केली ?
👉 विठ्ठल रामजी शिंदे

8) “विटाळ विध्वंसक” हे पुस्तक कोणाचे आहे ?
👉 गोपाळबाबा वलंगकर

9) डॉ.आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली ?
👉 येवला (नाशिक)

10) इ. स. १९२० मध्ये “कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया” या संघटनेची स्थापना कोणी केली ?
👉 मानवेंद्रनाथ रॉय

11) भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला ?
👉 १८८१ (लॉर्ड रिपन)

12) इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात सरदार पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह केला ?
👉 सेटलमेंट ॲक्ट (शेतसारा)

13) भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण ?
👉 अन्नपूर्णा

14) लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओलखले जाते ?
👉 गोपाळ हरी देशमुख

15) “मूकनायक” हे पाक्षिक कोणी सुरू केले ?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1920)

16) गांधी – आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला ?
👉 ५ मार्च १९३१

17) “मुस्लिम लीग” ची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती ?
👉 ढाका (एहसान मंजिल पॅलेस)

18) “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे” मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
👉 नागपुर

19) सुभाष चंद्र बोस यांना “देशनायक” म्हणून कोणी संबोधले ?
👉 रवींद्रनाथ टागोर

20) म. गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे ?
👉 मोहनदास करमचंद गांधी
===========================

===========================
21) पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षवृत्त आहेत ?
👉 181 (90+90+1 बृहत्तवृत)

22) भारताला एकूण किती Km लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
👉 7517 Km

23) महाराष्ट्रतील पहिल्या अनुभट्टीचे नाव काय होते ?
👉 अप्सरा (1956)

24) महाराष्ट्रतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?
👉 कोयना

25) महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?
👉 गडचिरोली (68.81%)

26) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ?
👉 पॅसिफिक महासागर

27) इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो ?
👉 नाईल

28) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
👉 ग्रीनलँड

29) “रणथंबोर” हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
👉 राजस्थान

30) “अस्तंभा डोंगर” कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 नंदुरबार

31) खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
👉 सांगली

32) दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
👉 86.6 %

33) कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
👉 सातारा व रत्नागिरी

34) फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे ?
👉 भिलाई – हत्तीसगड (भारत-रशिया मैत्रीचे प्रतीक)

35) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे ?
👉 शुक्र

36) ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात ?
👉 भूकंपनाभी (अपिसेंटर)

37) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याल सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?
👉 रत्नागिरी (237 km)

38) उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
👉 भीमा

39) पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?
👉 अकोला

40) तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे ?
👉 चामडे व कोको उत्पादन

41) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
👉 उपराष्ट्रपती

42) राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात ?
👉 राष्ट्रपती

43) घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली ?
👉 9 डिसेंबर 1946 (हं.अध्यक्ष-डॉ.सचिदानंद सिन्हा)

44) भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते ?
👉 आंध्रप्रदेश (1953 मद्रास प्रांतातून वेगळे)

45) बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण ?
👉 निलम संजीव रेड्डी (सर्वात तरुण व्यक्ती)

46) भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो ?
👉 महान्यायवादी

47) मतदाराचे वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्ती नुसार 18 वर्ष करण्यात आले ?
👉 61 वी घटनदुरुस्ती (1989)

48) राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?
👉 25 जानेवारी (25 jan 1950 राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना)

49) नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे सादर करतात ?
👉 राष्ट्रपती

50) संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले ?
👉 14 ऑगस्ट 1947

51) राज्यपालांना अभिभाषणंसाठी कोण आमंत्रित करतात ?
👉 महाधिवक्ता

: 44वी घटनादुरुस्ती 1978

1)  लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला.

2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली.

3) संसदीय विशेषाधिकाराबाबद ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला.

4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपध्द्तीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले.

5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.

6) अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली.

7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले.

8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.

9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.

10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या.

11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला.

12) कलम २० आणि कलम २१ अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत.

13) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूकवादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत ही तरतूद वगळण्यात आली.

: ❇️ भारतातील पहिली सर्व महिला संचालित सहकारी बँक राजस्थानमध्ये सुरू होत आहे

◆ तेलंगणा सरकारच्या स्त्री निधी क्रेडिट कोऑपरेटिव्ह फेडरेशनशी झालेल्या सामंजस्य करारानंतर (एमओयू) सहकार क्षेत्रातील पहिली सर्व महिला चालवली जाणारी वित्तीय संस्था लवकरच राजस्थानमध्ये येत आहे.

◆ नवीन संस्था त्यांच्या उद्योगांना पाठिंबा देऊन महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देईल.

◆ तेलंगणाच्या स्त्री निधीच्या धर्तीवर राजस्थान महिला निधीची स्थापना केली जाणार आहे.

: ❇️ नवप्रभा महिला प्रभाग संघाला ‘आत्मनिर्भर संघटन’ राष्ट्रीय पुरस्कार :-

◆ केंद्राच्या दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान कार्यक्रमाअंतर्गत देशातील प्रभाग संघांना समाजोपयोगी कामांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

◆ याअंतर्गत ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) तर्फे नामांकन देण्यात आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नवप्रभा महिला प्रभाग संघाला ‘आत्मनिर्भर संघटन’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

❇️ देवायतनमः मंदिर वास्तुकला परिषद :-

◆ केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी कर्नाटकातील हंपी येथे ‘देवायतनम’ या भारतातील मंदिर वास्तुशिल्पावरील परिषदेचे उद्घाटन फेब्रुवारी 2022 मध्ये केले.

◆ आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उत्सवाचा भाग म्हणून ही परिषद सांस्कृतिक मंत्रालयाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संस्थेद्वारे आयोजित करण्यात आली होती.

◆ हम्पीची मंदिरांना युनेस्कोचा (UNESCO) जागतिक वारसा दर्जा प्राप्त आहे समाविष्ट करण्यात आली आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏋‍♀ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 – भारत 🏋
━━━━━━━━━━━━━━━━━
🥇 मीराबाई चानू – (49 Kg गट) — वेटलिफ्टींग
🥇 जेरेमी लालरिनुंगा – (67 Kg गट) — वेटलिफ्टींग
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥈 संकेत सरगर – (55 Kg गट) — वेटलिफ्टींग
🥈 बिंदीयाराणी देवी – (55 Kg गट) — वेटलिफ्टींग
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥉 गुरुराज पुजारी – (61 Kg गट) — वेटलिफ्टींग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button