खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

वेटलिफ्टिंग

मीराबाईची पदककमाई

२०१४   राष्ट्रकुल रौप्य

२०१७   जागतिक अजिंक्यपद सुवर्ण

२०१८   राष्ट्रकुल सुवर्ण

२०२०   ऑलिम्पिक  रौप्य

२०२२   आशियाई अजिंक्यपद कांस्य

२०२२   राष्ट्रकुल सुवर्ण

राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ किलोपाठोपाठ ४९ किलो वजनी गटातही विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक पटकावले.

✍️खारघर -आयुष संकुल
🔸उद्घाटन: सर्वानंद सोनोवाल(केंद्रीय आयुष मंत्री)
🔸 ठिकाण: खारघर(नवी मुंबई)
🔸ह्या नव्या संकुलात, केंद्रीय युनानी चिकित्सा परिषदेच्या अधिपत्याखाली, प्रादेशिक  होमिओपॅथी   संशोधन संस्था (RRIH)आणि प्रादेशिक युनानी चिकित्सा संशोधन संस्था (RRIUM) सुरु होणार आहेत.
🔸1999.82 चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधलेल्या, या तीन मजली इमारतीच्या संकुलात वैद्यकीय तसेच संशोधन सुविधा आहेत.
🔸संशोधनासोबतच रुग्ण सल्ला, रोगनिदान, औषधोपयोजना, रक्ततपासणी, आणि जैवरसायन चाचण्या, अशा मुलभूत वैद्यकीय सुविधाही या संकुलात उपलब्ध असतील.
🔸होमिओपॅथी  प्रादेशिक संशोधन संस्थेला, ‘अॅलर्जीमुळे होणाऱ्या विकारांवर संशोधन संस्था’ म्हणून  विकसित करण्याचा आयुष मंत्रालयाचा विचार आहे, तसेच, युनानी प्रादेशिक संशोधन संस्थेला, इलाज-बित-तदबीर म्हणजेच,  जीवनशैलीत बदल घडवून सुदृढ शरीराठी दिल्या जाणाऱ्या उपचारांचे उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे.

✍️सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्याची कालमर्यादा घटवली
🔸सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्याची कालमर्यादा 45 दिवसांवरून 30 दिवसांवर आणण्यात आली आहे.
🔸पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन राज्यमंत्री  डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
🔸गेल्या वर्षी(2021) प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने   सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठीची  कमाल कालमर्यादा 60 दिवसांवरून 45 दिवसांपर्यंत कमी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button