खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पिंगळवाडे आणि जळोद येथे गुरांना घटसर्प व फऱ्या रोगाचे लसिकरण

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील पिंगळवाडे आणि जळोद गावात जनावरांना घटसर्प व फऱ्या रोगांचे मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात आले. यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पावसाळ्याला आता लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध साथीच्या रोगापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने पशुधनाला मान्सूनपूर्व लसीकरण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात पशुधणाला प्रामुख्याने घटसर्प व फऱ्या या आजरांची लागण होते. यापासून बचाव म्हणून प्रतिबंधक लसीकरण मोहीम पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ अंमळगाव यांचे अंतर्गत पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरज बोराखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावात लसीकरण करण्यात आले. लसीकरनाची सुरुवात उपसरपंच अतुल पाटील, देविदास देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रसंगी व्ही. अ. धनगर, राजेंद्र बाविस्कर, अमोल धनगर, विवेक वानखेडे यांनी सहकार्य केले.

जळोद येथेही लसीकरण

जळोद गावात जनावरांना घटसर्प व फऱ्या रोगांचे मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात आले. सरपंच भारती शशिकांत साळुंखे यांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात आले. प्रसंगी शशिकांत साळुंखे, विलास देशमुख, देवराम चौधरी, ज्ञानेश्वर पाटील व ग्रामपंचायत सदस्य व्ही. अ. धनगर, ध. पी. चौधरी, अमोल धनगर, विवेक वानखेडे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button