खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

डांगरी येथील दोघांनी विष प्राशन करून संपवले आपले जीवन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील डांगरी येथील दोघांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ७ रोजी घडली. उपचार घेतांना दोघांचा मृत्यू झाला असून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डांगरी येथील भीमा शिवा भिल वय २५ याने ७ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्वतःच्या घरात विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तर त्याच दिवशी सायंकाळी साडे सात वाजता वालचंद तोताराम भिल (वय ५५) यांनी देखील विषारी सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनाही उपचारसाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून धुळे येथे १०८ रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले. रवींद्र भिल व कैलास भिल यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूचे दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button