खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रा. डॉ. निलेश पवार यांना राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार प्रदान

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनातर्फे प्रा. डॉ. निलेश पवार यांना राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात पार पडला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थी व प्राध्यापक यांना गेल्या पाच वर्षातील राष्ट्रीय सेवा योजनेत भरीव कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेल्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मंगळवारी दिनांक 25 एप्रिल रोजी मुंबईतील एस एन डी टी महिला विद्यापीठात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते वर्ष 2019-20 करिता प्रा. डॉ. निलेश शांताराम पवार (कार्यक्रम अधिकारी, प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त )) यांना रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. खान्देश शिक्षण मंडळ, प्रताप महाविद्यालयास प्रथमस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने याबद्दल प्रताप महाविद्यालयातील कार्याध्यक्ष हरिभाऊ वाणी, कार्याउपाध्यक्ष योगेश भैया मुंदडे,  संदेश गुजराथी, नीरज अग्रवाल, प्रदीप  अग्रवाल, प्राचार्य प्रा. डॉ. पी आर शिरोडे, सचिव प्रा. डॉ. ए बी जैन,   आयक्यूएसी  को-ऑर्डिनेटर  प्रा. डॉ. जयेश गुजराथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button