खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर नगरपालिकेत वीज निर्मितीचा अभिनव उपकरणचे उद्घाटन व लोकार्पण

अमळनेर नगरपालिकेत वीज निर्मितीचा अभिनव उपकरणचे उद्घाटन व लोकार्पण

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषद कार्यालयात माझी वसुंधरा अभियानांतर्गत वीज निर्मीतीचा अभिनव उपकरणचे उद्घाटन व लोकार्पण माजी नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील , प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, माझी वसुंधरा २.० चे नोडल अधिकारी व प्रशासन अधिकारी संजय चौधरी , नगर अभियंता अमोल भामरे , डिगंबर वाघ , नगररचना सहा , विकास बिरारी , आबिद शेख व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर उपकरण पाहण्यासाठी कार्यक्रमास शहरातील नागरिकांचीही गर्दी झालेली होती. अभियंता प्रशांत ठाकूर यांनी सदर उपकरणाचे कार्य पध्दती उपस्थितींना सांगितली. उपकरणाची कार्यपध्दती : दैनदिन कार्यालयात बरेच नागरिक काहीना काही कामांसाठी पालिकेत येत असतात . नागरिक ज्यावेळी पालिकेच्या प्रवेशव्दारावरील मॅट वर पाय ठेवतील त्यावेळी तेथे असलेले “पावर स्टेप ” प्रणाली कार्यान्वित होईल . ज्यामुळे याप्रणालीतील शक्तीशाली चुंबकामध्ये हालचाल निर्माण होवून आतील कॉपर कॉईल मध्ये ईएमएफ अर्थात व्होटेज तयार होईल . आता एका पाऊलाने साहाजिकच कमी प्रमाणात व्होटेज तयार होईल . परंतू अशीच हालचाल सतत होत राहील तेव्हा मोठ्या प्रमाणात व्होटेज तयार होईल . ( जसे थेबे थेबे तळे साचे ) , असे पाऊलां पाऊलांनी तयार झालेले व्होटेज एका १२ / ०६ व्ही बॅटरी मध्ये स्टोअर करण्यात येईल.

ऊर्जेचा अपव्यय न होता होईल बचत

एका पुर्ण पणे डिसचार्ज बॅटरीस साधारण ७ ते ८ तास चार्ज होण्यासाठी लागतात. म्हणजे कार्यालय वेळेत १० ते ६ दरम्यान नागरिकाच्या रहदारीने कोणत्याही विजेच्या वापराशिवाय बॅटरी चार्ज होईल. पुर्ण पणे चार्ज झालेली बॅटरी आपणास दिवे ( लाईट ) प्रकाशित करण्यासाठी वापरण्यात येईल . रात्रीच्या वेळी ९ दोन दिवे साधारण ६ ते ७ तास चालु राहतील . दिव्यांना पीआआर मोशन सेंसर लावण्यात आलेले आहे . ज्यावेळी एखादी चल वस्तू या सेंसरच्या क्षेत्रात आल्या म्हणजेच प्रवेशव्दाराच्या गेट वर आल्यास दिवा अटोमॅटीक प्रकाशित होईल. ज्यामुळे तयार झालेल्या ऊर्जेचा अपव्यय न होता बचत होईल.

महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका ठरणार

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत ऊर्जा या घटकात अमळनेर नगरपरिषदेचा आदर्श ऊर्जा निर्मीती व बचतीचा महत्वकांशी प्रकल्प असून हा प्रकल्प प्रायोजिक तत्वावर उभारण्यात आलेला आहे . असा हा प्रकल्प राबविणारी अमळनेर ही महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका ठरणार आहे. नागरिकांच्या नगरपालिकेत येण्यामुळे नगरपरिषदेस ऊर्जा निर्मीती करून देईल . यामुळे ऊर्जा बचती कडे एक पाऊल नक्कीच उचलेले आहे . यामुळे आम्ही ( अमळनेर नगरपालिका ) म्हणतो तुमचे एक पाऊल ऊर्जा निर्मीतीसाठी ” . हा प्रयोग शहरातील इतर ठिकाणी जसे ज्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ ( ये – जा ) असते त्याठिकाणी उदा . मार्केट , उद्यान , शासकिय कार्यालये , बँक इ . राबविण्यात येणार आहे .
प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी नपा अमळनेर

जाहीरात

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button