खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

जानवे येथे चोरी करणारे दोन्ही चोरटे निघाले मोटारसायकल चोर

जानवे येथे चोरी करणारे दोन्ही चोरटे निघाले मोटारसायकल चोर

ठाणे, कल्याण येथून मोटारसायकली चोरून मुक्ताईनगर परिसरात विकल्याची कबुली

अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामसुरक्षा पथकाच्या सर्तकतने ठाणे, कल्याण येथून मोटारसायकली चोरणाऱ्या दोघांना जानवे येथे चोरीचा प्रयत्न करतांना पकडण्याची यशस्वी कामगिरी केली आहे. तर दोघा चोरट्यांनी चोरलेल्या मोटारसायकली मुक्ताईनगर परिसरात विकल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याही जप्त केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २२ रोजी रात्री साडे बारा वाजता वाजेच्या सुमारास जानवे येथे पोलीस पाटील विलास पाटील , विलास बारकू भिल , भैय्या सुरेश भिल , प्रमोद नाना भिल , अनिल संतोष भिल हे गस्त घालत असताना त्यांना प्रफुल्ल दगडू पाटील यांच्या टपरीजवळ एक तरुण टेहळणी करीत असल्याचे तर दुसरा लोखंडी सळई ने टपरीचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. गस्तीवरील पथकाने ताबडतोब दोघांना पकडून त्यांच्याजवलील लोखंडी वस्तू ताब्यात घेतल्या. पथकाने त्यांना दरडावून विचारले असता त्यांची नावे राजू विक्रम खांडेलकर (वय २०) व दीपक रवींद्र पाटील (वय २०, रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर) असे सांगितले. सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याजवळील मोटरसायकल (क्रमांक एमएच ०४, केजी ७३१२) ही अंधारात लपवून ठेवली होती. ही मोटरसायकल त्यांनी २१ मार्च रोजी कोणगाव (ता. कल्याण येथून चोरल्याचे सांगितले. पथकाने लागलीच हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण कुमावत याना बोलावून दोघं चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस पाटील विलास पाटील यांनी खबर दिल्यावरून दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, १५ मार्च रोजी देखील इंदापिंप्री येथील ग्राम संरक्षक पथकाने एक मोटरसायकल चोरांकडून जप्त करून चोरांचे छाया चित्र कॅमेऱ्यात टिपले आहे.

सहा चोरीच्या दुचाकी केल्या जप्त

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी ठाणे आणि कल्याण येथून अनेक मोटारसायकली चोरून त्या मुक्ताईनगर परिसरात विकल्याची कबुली दिली. हिरे यांनी संपूर्ण माहिती घेऊन पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , पोलीस नाईक मिलिंद भामरे , सूर्यकांत साळुंखे , सिद्धांत शिसोदे , शरद पाटील , रवींद्र पाटील ,दीपक माळी यांच्या पथकाला विविध ठिकाणी मोटारसायकली जप्त करण्यासाठी पाठवले. त्यांनी मुक्ताई नगर परिसरातून सहाही मोटारसायकली विविध व्यक्तींकडून ताब्यात घेतल्या आहेत.

जाहीरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button