खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

एमबीबीएस उत्तीर्ण वैभव मगरचा ढेकूरोडवासीयांनी केला गौरव

एमबीबीएस उत्तीर्ण वैभव मगरचा ढेकूरोडवासीयांनी केला गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील आशीर्वाद नगर मधील रहिवासी वैभव मगर एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याने याचा ढेकूरोडवासीयांनी त्याचा सत्कार केला.
वैभव किशोर मगर हा एमजीएम मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट औरंगाबाद यातून उत्तीर्ण झाला असून तो डांगरी येथील प्राथमिक शिक्षक किशोर खंडेराव मगर, उपशिक्षिका उषा किशोर मगर यांचा लहान चिरंजीव असून झाडी येथील मुख्याध्यापक मनोहर मगर यांचा पुतण्या आहे. त्यानिमित्ताने ढेकूरोड परिसरवासीयांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी ग्रामविकास अधिकारी विठ्ठल पाटील, एस. आर. पाटील, संजय पवार, दिलीप पाटील, आधार पाटील, गोकुळ पाटील, प्रवीण पवार, सुधाकर धोबी, राजेंद्र जैन, रवींद्र सनेर, कैलास सनेर, निलेश पाटील फाफोरेकर, अविनाश मगर, विजयसिंह पवार, परेश मगर, संजय पाटील आदींनी घरी जाऊन त्याचा गौरव केला आहे. त्याने त्याच्या यशाचे श्रेय आईवडील यांना दिले आहे.

जाहीरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button