खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण न्या. अग्रवालांनी केले मार्गदर्शन

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण न्या. अग्रवालांनी केले मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुका विधी सेवा समिती व अमळनेर वकील संघांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ व्यायामशाळेत जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. सह दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग एस. एस.अग्रवाल यांनी महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण यावर मार्गदर्शन केले.
एस.एन.डी.टी.महिला महाविद्यालयातील सह प्राध्यापिका डॉ. मंजुषा खरोले यांनी महिला शिक्षण व सबलीकरण याचं महत्त्व पटवून दिले. तहसील कार्यालयातील अव्वल कारकून संगीता धोंगडे यांनी महिलांविषयी शासकीय योजनांची माहिती दिली. ग्राहक पंचायतच्या अध्यक्ष अॅड. भारती अग्रवाल, सचिव कपिला मुठे, संघटक करुणा सोनार, उपाध्यक्ष स्मिता चंद्रात्रे, कोषाध्यक्ष वनश्री अमृतकर ,सदस्य अॅड. उमा अग्रवाल, गंगा अग्रवाल, विमल मैराळे आदी उपस्थित होत्या. अमळनेर महिला मंचच्या अध्यक्ष अपर्णा मुठे, कांचन शाह, सरोज भांडारकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. महिला मंचच्या विद्या हजारे, पद्मजा पाटील, शीला पाटील उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. नयना नवसारीकर यांनी केलं. आभार अॅड. भारती अग्रवाल यांनी मानले.

जाहीरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button