खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

1) ‘सजातीय’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

1) उपजातीय 2) विजातीय
3) संकीर्णजातीय 4) अजातीय

उत्तर :- 2

2) ‘उचलली जीभ लावली टाळयाला’ या म्हणीचा अर्थ काय ?

1) घशाला 2) एक सारखे बोलत राहणे
3) मनात येईल तसे बोलणे 4) काहीच न बोलता गप्प राहणे

उत्तर :- 3

3) ‘धीर सोडणे’ हा अर्थ सूचित करणारा वाक्प्रचार ओळखा.

1) हात टेकणे 2) हाडाची काडे करणे
3) हातपाय गाळणे 4) हातखंडा असणे

उत्तर :- 3

4) “बोधपर वचन” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

1) सुभाषित 2) सुविचार
3) ब्रीदवाक्य 4) वरील सर्व

उत्तर :- 4

5) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?

1) नीयुक्त 2) नीयूक्त
3) नियुक्त 4) नियुत्क

उत्तर :- 3

6) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता?
1) र 2) ग
3) ज 4) यापैकी नाही
उत्तर :- 3

7) उच्छेद या जोडशब्दातील अचूक पोटशब्द ओळखा.

1) उ + च्छेद 2) उत + च्छेद
3) उच् + छेद 4) उत् + छेद

उत्तर :- 4

8) शब्दाची जात बदलून वाक्यरचना करा.
‘त्याच्या डोळयात पाणी आले.’

1) त्याच्या डोळयात पाणी येते 2) त्याच्या डोळयातून पाणी वाहते
3) त्याचे डोळे पाणावले 4) त्याच्या डोळयांना धरा लागतात

उत्तर :- 3

9) ‘अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप’ ही संख्यावाचक विशेषणे विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?

1) पूर्णासूचक संख्या विशेषण 2) अपूर्णांकसूचक संख्याविशेषण
3) अनिश्चित संख्यासूचक विशेषण 4) साकल्यवाचक संख्याविशेषण

उत्तर :- 2

10) जा, ये, उठ, बस, खा, पी वगैरे धातूंपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना ……………….. म्हणतात.

1) सिध्द क्रियापद 2) साधित क्रियापद
3) संयुक्त क्रियापद 4) व्दिकर्मक क्रियापद

उत्तर :- 1

: ✅ *राज्य फुलपाखरू जाहीर करणारे राज्य*

🦋 महाराष्ट्र : ब्लु मॉरमॉन

🦋 उत्तराखंड : कॉमन पिकॉक

🦋 कर्नाटक : सदर्न बर्ड विंग्स

🦋 केरळ : मलबार बॅंडेड पिकॉक

🦋 तमिळनाडू : तमिळ येमॉन

🦋 अरुणाचल : कैसर-ए-हिंद

: 💠भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे 💠

🧩बंदरे – राज्य

1) कांडला – गुजरात

2) मुंबई – महाराष्ट्र

3) न्हाव्हाशेवा – महाराष्ट्र

4) मार्मागोवा – गोवा

5) कोचीन – केरळ

6) तुतीकोरीन – तमिळनाडू

7) चेन्नई – तामीळनाडू

8) विशाखापट्टणम – आंध्रप्रदेश

9) पॅरादीप – ओडिसा

10)न्यू मंगलोर – कर्नाटक

11) एन्नोर – आंध्रप्रदेश

12) कोलकत्ता – पश्चिम बंगाल

13) हल्दिया – पश्चिम बंगाल

💠महाराष्ट्र – जलाशय व धरणे.

🅾कोयना – शिवाजी सागर – (कोयना) हेळवाक (सातारा)

🅾जायकवाडी – नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

🅾बाभळी प्रकल्प – (गोदावरी) नांदेड

🅾 भंडारदरा – (प्रवरा) अहमदनगर

🅾गंगापूर – (गोदावरी) नाशिक

🅾 राधानगरी – (भोगावती) कोल्हापूर

🅾मोडकसागर – (वैतरणा) ठाणे

🅾 उजनी – (भीमा) सोलापूर

🅾तोतलाडोह – मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

🅾यशवंत धरण – (बोर) वर्धा

🅾 खडकवासला – (मुठा) पुणे

🅾येलदरी – (पूर्णा) परभणी

: *दिनविशेष*

३ मार्च  : जन्म

१८३९: टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)
१८४५: जर्मन गणितज्ञ जॉर्ज कँटर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)
१८४७: टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)
१९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
१९२३: इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
१९२६: संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०१२)
१९२८: कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.
१९३९: भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९९९)
१९५५: विनोदी अभिनेता जसपाल भट्टी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २०१२)
१९६७: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म.
१९७०: पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांचा जन्म.
१९७७: भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.

३ मार्च  : मृत्यू

१७०३: इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १६३५)
१७०७: सहावा मोघल सम्राट औरंगजेब यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)
१९१९: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८६४)
१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.
१९६५: पार्श्वगायिका आणि अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांचे निधन.
१९६७: माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.
१९८२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)
१९९५: तबलावादक पं. निखील घोष यांचे निधन.
२०००: मराठी चित्रपट अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन.

३ मार्च : महत्वाच्या घटना

इ. स. ७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.
१८४५: फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.
१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
१९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
१९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
१९३८: सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.
१९३९: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.
१९४३: दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार.
१९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
१९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.
१९८६: ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या शरच्‍चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
————————-

: *दिनविशेष*

४ मार्च : जन्म

१८६८: चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.
१८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९८५)
१९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४)
१९२२: गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री विना पाठक यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर २००२)
१९२६: अॅमवे चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.
१९३५: कॉंग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म.
१९७३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.
१९८०: भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म.
१९८६: इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.

४ मार्च : मृत्यू

१८५२: रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार निकोलय गोगोल यांचे निधन.
१९१५: ब्रिटिश समर टाईम चे निर्माता विल्यम विल्लेत्त यांचे. (जन्म: १० ऑगस्ट १८५६)
१९२५: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मे १८४९ – कोलकाता, पश्चिम बंगाल)
१९४८: भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक बाळकृष्ण शिवारम मुंजे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८७२)
१९५२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)
१९७६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८८६)
१९८५: साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.
१९९२: सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.
१९९५: चरित्र अभिनेता इफ्तिखार (जन्म: २२ फेब्रुवारी १९२०)
१९९६: नाटककार आणि पत्रकार आत्माराम सावंत यांचे निधन.
१९९७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट इह. डिक यांचे निधन.
१९९९: भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.
२०००: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी (जन्म: ८ जानेवारी १९२४)
२००७: भारतीय संसद सदस्य सुनील कुमार महातो यांचे निधन.
२०११: केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुनसिंग यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)

 

४ मार्च : महत्वाच्या घटना

१७९१: व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.
१८३७: शिकागो शहराची स्थापना झाली.
१८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.
१८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.
१९३६: हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.
१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
१९६१: इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.
१९७४: पिपल मॅगझिन चे पहिले प्रकाशन झाले.
१९८०: प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
————————-

भारताची राज्यघटना – भारतीय संविधान

भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.

नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून राज्यघटना अंमलात आली.

1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.

ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.

अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.

यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.

संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.

त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.

मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.

सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.

सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.

मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.

राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button