खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अन्नसुरक्षा योजनेच्या लाभासाठी लोक संघर्ष मोर्चाचे २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषण

अमळनेर (प्रतिनिधी )सतत पाठपुरावा करूनही अमळनेर तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याने लोक संघर्ष मोर्चाचे २६ जानेवारी पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
अमळनेर तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना वर्षभरापुर्वी शासकीय योजनेत मिळालेले रेशनकार्ड  वेळोवेळी विनंती निवेदन देऊन हि आदिवासी कुटुंबांचे रेशनकार्ड आजतागायत ऑनलाइन हि केलेले नाहीत व अमळनेर तहसील कार्यालयाकडून दिनांक ३/६/२०२१ च्या पत्रानुसार पाठपुरावा करून हि आजपर्यंत एक हि कुटुंब अन्नसुरक्षा योजनेत घेतले नसल्याने व तालुक्यातील एका गावाची सप्टेंबर २०२१  मधे तहसीलदार साहेबांनी निर्गमित केलेली ६६ लाभार्थ्यांची अन्नसुरक्षा यादीतील ५६  ते ६६ क्रमांक वरिल ११ आदिवासी लाभार्थी वगळता इतर लाभार्थ्यांचे रेशनकार्ड ऑनलाइन करून अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देत आहेत, लोकसंघर्ष मोर्चा ने  वेळोवेळी पाठपुरावा करून हि तालुक्यातील आदिवासी कुटूंबांना अन्नसुरक्षा योजनेत वंचित ठेवत असल्याने लोकसंघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ जानेवारी २०२२  पासून कोरोणा लसीचे दोन डोस घेतलेले, मास्क लावून, सामाजिक अंतर ठेवून, कोरोणा साथरोगाचे नियम पाळत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते आदिवासी रेशनकार्ड धारक कुटुंब न्याय मिळेपर्यंत अमळनेर येथे तहसील कचेरी समोर आमरण उपोषणास बसणार आहेत, त्याबाबतचे निवेदन तहसीलदार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
छगन भुजबळ, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी , प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक  यांना दिनांक १० जानेवारी रोजी देण्यात आले असून सदर निवेदनावर लोकसंघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे सह मधुकर चव्हाण, रावसाहेब पवार, अविनाश पवार, बालीक पवार, विनायक सोनवणे, भिमसिंग पाडवी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button