खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

कोरोनाच्या शिरकावची धास्ती, ख्रिसमस, नविन वर्षाचे स्वागोत्सवसह विवाह सोहळ्यातील उपस्थितीवर घातले निर्बंध

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले  आदेश

खबरीलाल– अमळनेर (प्रतिनिधी) जिल्ह्यात दिनांक 25 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस, नविन वर्षाचे स्वागोत्सव आणि अन्य गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांनी घातलेल्या निर्बंध नुसार आता  लग्न समारंभ, इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम, बंदिस्त जागेमध्ये  साजरा होणारे लग्न समारंभ हे केवळ 100 व्यक्तींच्या मर्यादेत साजरा करता येतील. तर मोकळ्या जागेत साजरा होणारे लग्न समारंभ हे केवळ 250 व्यक्तींच्या मर्यादेत किंवा त्या जागेच्या क्षमतेच्या 25% यापैकी जे कमी असेल ती क्षमता लागू राहील. तसेच क्रिडा कार्यक्रम / स्पर्धा साजरा करतांना प्रेक्षक क्षमता ही एकूण क्षमतेच्या 25 % राहील.

यासाठी घ्यावी लागणार परवानगी

कार्यक्रम / स्पर्धा वगळता इतर प्रकारचे मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे किर्तन, रथोत्सव, पालखी सोहळा, उरुस, कुस्ती, दंगल, यात्रा- जत्रा भरवणे, प्रदर्शने आदी भरवण्यासाठी  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती, जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.

हे राहतील 50 टक्के क्षमतेने सुरू

रेस्टॉरंट , जिम्नॅशिअम, स्पा सेंटर, सिनेमा हॉल / थिएटर्स हे आसन क्षमतेच्या 50 % क्षमतेसह सुरु राहतील. याकरीता संबंधित चालक / मालक यांनी उपलब्ध असलेली क्षमता व 50 % क्षमता जाहिर करणे अनिवार्य राहील.

जमावबंदीही केली लागू

सार्वजनिक ठिकाणी रात्री 09.00 ते सकाळी 06.00 वाजेपावेतो 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. राहील, कायद्याव्दारे बंधनकारक असणाऱ्या पूर्व नियोजित वैधानिक सभा ह्या सभागृहाच्या क्षमतेच्या 25% पेक्षा जास्त व सभागृहात 100 पेक्षा जास्त व्यक्तींची सभा घ्यायची असेल अशा वैधानिक सभा ह्या ऑनलाईन पध्दतीने घेता येतील.

लसीकरण प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य

दुकान, आस्थापना, मॉल्स, समारंभ, संमेलने (मेळावे), रेस्टॉरंट , जिम्नॅशिअम, स्पा सेंटर, सिनेमा हॉल / थिएटर्स, लग्न समारंभ, सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम,इत्यादी ठिकाणी शासन आदेश नुसार कोबिड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहिल किंवा 48 तासाच्या आतील कोविड19 आरटीपीसीआरचा निगेटीव्ह चाचणीचा अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

अत्यावश्यक सेवांना दिली शिथिलता

“वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल स्टोअर्स, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, शासकीय अधिकारी / कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाची संबंधित घटक” यांना सुट राहील. तथापि संबंधितांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील, पूर्व नियोजित परिक्षा असल्यास परिक्षार्थी व परिक्षेकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी /कर्मचारी यांना ही सुट राहील. तथापि त्यांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button