खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अमळनेर पालिकेच्या आरोग्य पथकाची दोन प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील प्लॅस्टिक निर्मुलनसाठी नगरपरिषदेतील आरोग्य विभागाच्या पथकाने शहरात दोन प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करून ५ हजराचा दंड केला. तर दुसऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जाहीरात

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या आदेशाने बाजारपेठेत नगरपालिकेच्या पथकाने छापा टाकून जगदीश नांगो चौधरी व  मुश्ताक बागवान याना प्लास्टिक विक्री करताना रंगेहाथ पकडले.  त्याबाबत त्यांना दंड भरणेबा नोटीस बजावण्यात आली होती त्यावरुन  जगदीश नागो चौधरी यांनी रु ५ हजार दंड भरला व मुश्ताक बागवान ने दंड भरण्यास नकार दिला म्हणून  त्याच्या विरुद्ध  नगरपरिषदे मार्फत पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई स्वच्छता निरीक्षक  युवराज चव्हाण, स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक अरंविद कदम, ज्ञानेश्वर संदानशिव, शांताराम संदानशिव गोपाल  बिऱ्हाडे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button