खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास “लोकसंघर्ष मोर्चा”ने दिला जाहीर पाठिंबा

अमळनेर (प्रतिनिधी ) राज्यभरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास लोकसंघर्ष मोर्चाने जाहीर पाठिंबा दिला आहे. मागण्या मान्य न केल्यास वेळ प्रसंगी लोक संघर्ष मोर्चा या आंदोलनात सक्रिय उतरेल, असा ईशारा ही दिला आहे.
लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी जाऊन श्रीमंतापासून ते गोर, गरीब, खेडया, पाड्यावर, राहणारे व्रुद्ध, महिला, सह सर्व जाती धर्माच्या प्रवाश्यांना सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय हक्कासाठी लढण्याची हिम्मत देत मार्गदर्शन करीत पाठिंबा दिला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, व परिवहन मंत्री अनिलजी परब यांना, एसटीची सेवा “प्रवाशांच्या सेवेसाठी” या ब्रिदवाक्यानुसार कर्मचार्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी केली.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनातील सर्वच मागण्या मंजुर कराव्यात यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना लोकसंघर्ष मोर्चा पाठिंबा देत आहे, वेळ पडल्यास लोक संघर्ष मोर्चा ह्या आंदोलनात सक्रिय उतरेल, असा ईशारा देत पत्र दिले आहे. यावेळी लोक संघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळेसह प्रा.अशोक पवार , बन्सिलाल भागवत गुरुजी, संदिप घोरपडे , रियाज शेख, संजय पवार, दयाराम पाटील, कलीम शेख, बालीक पवार, गणेश चव्हाण, शराफत अली, मुस्तफा भैया ए टू झेड, शेख कलीमोद्दीन हाजीजलालोद्दीन, रोशन मावळे सह पदाधिकारी कार्यकर्ते हजर राहून पाठिंबा दिला.

तिकीट दरात ४०% होऊ शकते कपात

एसटी कर्मचाऱ्यांचा चालु असलेला संघर्ष फक्त पगारवाढीसाठी नसुन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी आहे. कारण एसटी म्हणजे राज्यशासनासाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे. करोडो लोकांचे एसटी हे प्रवासाचे साधन आहे आणि एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण झाल्यास १७ % असलेला प्रवासी कर रद्द होईल. टोल टॅक्स द्यावा लागणार नाही अर्थात एसटीचे वर्षाकाठी ३५०० कोटी रुपये वाचतील. महाराष्ट्र सरकारचा २७ % डिझेल कर रद्द होईल. हा पैसा वाचला म्हणजे तिकीट दरात जवळपास ४०% कपात होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button