खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शहराचे विद्रूपीकरण थांबण्यासाठी बॅनर आणि होर्डिंगवर न.प.ची धडक कारवाई

बेकायदेशीरपणे बॅनर आणि होर्डिंग लावणार्‍याच्या मागे आता न.प.चा ‘शनि’

अमळनेर (प्रतिनिधी ) शहराचे आणि सार्वजनिक मालमत्तांचे विद्रूपीकरण करणारे बेकायदेशीरपणे बॅनर आणि होर्डिंग काढण्यास अमळनेर नगरपालिकेने ‘शनि’वारी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे चमकोगिरी करणार्‍यांना चाप बसणार आहेत. तर या कारवाईचे सर्वसामान्य अमळनेरकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.
अमळनेर शहरात सन उत्सव आणि एखाद्या नेत्याच्या वाढदिवसाला गल्लोगल्ली कार्यकर्त्यांचे पीक ओतू जाऊन अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग लावण्याचे फॅड निर्माण झाले आहे. याला फार काही खर्च येत नसल्याने चमकीगिरी करणारे हवेत उडत असतात. नगरपालिकेने काही कारवाई केल्यास अधिकार्‍यांना दमबाजी करीत राजकिय आणि सामाजिक प्रेशर वाढून कारवाईला खीळ बसवतात. तर दुसरीकडे हे मोठ मोठे बॅनर/होर्डिंग अपघातालाही कारणीभूत ठरत असल्याने डोकेदुखी झाली आहे. तर शहराचे आणि सार्वजनिक मालमत्तांचे ही विद्रूपीकरण होत होते.
याला चाप लावण्यासाठी अनधिकृत होर्डिंगबाजांवर कारवाईसाठी पाऊल उचलण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व जळगाव शहर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी ऑनलाइन बैठक घेऊन  नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्याची तातडीने अमलबजावणी नगरपालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे दिवसभर ही कारवाई करण्यात आली.

‘खबरीलाल’ ने सविस्तर टाकला प्रकाश, खबरीलाल’च्या भूमिकेचेही स्वागत

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीची बातमी खबरीलाल’ ने सविस्तर देऊन प्रकाश टाकला. तसेच याच बॅनर/होर्डिंगमुळे शहरात कारवाई करतांना कसा प्रसंग उभा राहिला होता. त्याला कसे स्वरुप दिले होते, यामुळे शहर कसे वेठीस धरले होते, याची ही आठवण करून दिली होती. त्यामुळे नगरपालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी लगेच कारवाईला सुरुवात केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी ‘खबरीलाल’च्या पारदर्शी आणि निर्भीड भूमिकेचे स्वागत केले आहे.

संबधित प्रेस, बॅनर छपाई मालकांना नगरपालिकाकडून नोटिसा देण्यात येणार

प्रिंटींग प्रेसमध्ये जाहिराती, पोस्टर बॅनर्स छपाई करून विनापरवानगी कोणत्याही जाहिराती नगरपालिका क्षेत्रात लावता येणारन नाही. लावेल्या जाहिराती, बॅनवर परवानगी, क्रमांक, दिनांक, परवानगी, कालावधी टाकणे बंधनकारक असून तसेच शासनाने बंदी घातलेले बॅनर्स हे प्लॅस्टिक, मटेरियल थम्रोकालची नसावी, असे आढळून आल्यास संबधित प्रेस, बॅनर छपाई मालकांना नोटिसा देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली.

अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज लावल्यास शहर विद्रुपीकरणांर्तगत गुन्हे दाखल करू

शहरात कोणीही अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज लावण्याआधीच नगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास बॅनर किंवा होर्डिंग्ज तयार करणाऱ्यासह ज्याचे बॅनर, होर्डिंग्ज आहे. त्यांच्यावर शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत थेट गुन्हे दाखल करण्यात येतील.
प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी,अमळनेर नगरपरिषद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button