खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जिल्हानिबंधक यांनी मुद्रांक विक्रेत्यांच्या मनमानीला लावला चाप, कारवाईचा इशारा

किरण जाधव यांनी आपले सरकार पोर्टलवर केलेल्या तक्रारीची घेतली दाखल

अमळनेर (प्रतिनिधी ) मुद्रांक किमतीपेक्षा अधिक २० रुपये जादा घेणार्‍या मुद्रांक विक्रेत्यांना जिल्हानिबंधक तथा मुद्रांक अधिकारी विजय भालेराव यांनी मूळ किमतीतच विक्रीचे आदेश दिले आहेत. अन्यथा कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अमळनेर येथील मुद्रांक विक्रेते पाच रुपये व दहा रुपयांचे स्टॅम्प देत नाहीत. तसेच १०० रुपये व त्यावरील स्टॅम्प देतांना २०रुपये जादा आकारतात, अशी तक्रार किरण जाधव यांनी आपले सरकार पोर्टलवर केली आहे. त्यांच्या तक्रारीची जिल्हानिबंधक तथा मुद्रांक अधिकारी  विजय भालेराव यांनी दखल घेत दुय्यम निबंधकाना पत्र दिले आहेत.  सर्व मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांकाच्या किंमती एव्हडे पैसे घेण्याचे आदेश द्यावेत. दुय्यम निबनधक डी. पी. गांगोडे  यांनी सर्व मुद्रांक विक्रेत्यांना पत्र देऊन ग्राहकांना १००,५००,१००० रुपयांचे स्टॅम्प त्याच किमतीत उपलब्ध करून द्यावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे. यामुळे मुद्रांक विक्रेत्यांच्या मनमानीला चाप लागणार आहे. तर यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button