खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;>*⚜ भारतातील केरळ हे राज्य भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य असून त्याची एकूण साक्षरता 93.91 टक्के एवढी आहे. त्याच्या पाठोपाठ लक्षद्वीप ची साक्षरता आहे आणि त्याची एकूण साक्षरता 92.28 टक्के एवढी आहे. ⚜

<span;>🛑 साक्षरतेच्या बाबतीत प्रथम पाच राज्ये
<span;>
<span;>1) केरळ  (93.91%)
<span;> 2) लक्षद्वीप  (92.28%)
<span;> 3) मिझोराम  (91.58%)
<span;> 4) त्रिपुरा  (87.75%)
<span;> 5) गोवा  (87.40%)

<span;>🛑 साक्षरतेच्या बाबतीत शेवटची पाच राज्ये

<span;>1) बिहार  (63.82 टक्के )
<span;>2) तेलंगणा  (66.5 टक्के )
<span;>3) अरुणाचल प्रदेश  (66.95 टक्के )
<span;>4) राजस्थान  (67.06 टक्के )
<span;>5) आंध्र प्रदेश  (67.4 टक्के)

<span;>➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

<span;>*👨‍👩‍👧‍👦 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० 👨‍👩‍👧‍👦

<span;>राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची घोषणा 15 फेब्रुवारी 2000 रोजी डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ कार्य दलाच्या शिफारसी करण्यात आली

<span;>उद्देश दोन मुले “हम दो, हमारे दो” या तत्त्वाचा पुरस्कार करणे कारण 2043 पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्यात येईल.

<span;>धोरणाची लक्षणे 2040 पर्यंत अस्थिर लोकसंख्येचे लक्ष प्राप्त करण्यासाठी खालील लक्षणांचा उल्लेख केला जातो

<span;>शिशु मृत्यु दर 30 प्रति हजार 1000 पेक्षा कमी आणणे

<span;>मातामृत्यू दर 100000 माता मागे 100 पेक्षा कमी करणे

<span;>दोन मुलांच्या छोट्या कुटुंबात प्रोत्साहन देणे

<span;>सुरक्षित गर्भपात सुविधांमध्ये वाढ करणे एड्स माहिती उपलब्ध करणे मुलींचे लग्न 18 वर्षाच्या आत होऊ न देता ते वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्यास मान्यता देणे 80% प्रसूतीसाठी प्रशिक्षित स्टाफ चा उपयोग करणे.

<span;>🏆रोजगार हमी योजना :🏆

<span;>🔥सुरुवात – 1952

<span;>🔥उद्दिष्ट – ग्रामीण विकास घडवून आणण्यासाठी सर्वांगीण मदत करणे.

<span;>🔥पार्श्वभूमी – श्री.वि.स. पागे यांच्या शिफारशीवरून 1965 मध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात ही योजना राबविली त्यानंतर 1969 मध्ये काही निवडक भागात प्रयोगिक तत्वावर ही योजना लागू करण्यात आली.

<span;>🔥26 जानेवारी 1978 रोजी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी कायदा करून ही योजना सर्व महाराष्ट्रभर लागू केली.

<span;>🔥रोजगाराची हमी देणारा भारतातील प्रथम प्रयोग.

<span;>🔥‘मागेल त्याला काम’ तत्वावर ही योजना सुरू केली.

<span;>🏆योजनेचे स्वरूप :🏆

<span;>🔥शक्यतो शारीरिक कष्टाची कामे असतात.

<span;>🔥या योजनेसाठी 6 मार्गानी पैसा उपलब्ध होतो.

<span;>🔥18 वर्षावरील स्त्री-पुरूषांना कामे दिली जातात.

<span;>🔥मजुरी दर आठवड्याला दिली जाते.

<span;>🔥कामे कामगाराच्या घरापासून 8 कि.मी. अंतराच्या आत असतात.🔥
<span;>🏆.                                                                                          🏆
<span;>……………………….

<span;>. 🏆एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (I.R.D.P.)🏆

<span;>🔥सुरुवात – 1978

<span;>🔥उद्दिष्ट – ग्रामीण भागाचा एकत्रित विकास करणे.

<span;>🏆स्वरूप –🏆

<span;>🔥जे लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात त्याच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत बदल घडवून आणणे.

<span;>🔥हा कार्यक्रम चालविण्यासाठी केंद्र – राज्य 50:50 या प्रमाणात खर्च करतात.

<span;>🔥महाराष्ट्रात हा कार्यक्रम 2 ऑक्टोंबर 1980 पासून सर्व पंचायत समित्यामध्ये सुरू आहे.

<span;>🏆अवर्षण प्रवण विभाग कार्यक्रम (D.P.A.P.)🏆

<span;>🔥सुरुवात – 1974-75

<span;>🔥उद्दिष्ट – राज्यातील दुष्काळी भागातील लोकांना दुष्काळाशी यशस्वीरीत्या मुकाबला करता यावा.

<span;>🌺 नेहरू रिपोर्ट विषयी माहिती 🌺

<span;>🏛भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असता व त्याचे सारखे निषेध होत असता भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड त्या कमिशनचे समर्थन करीत होते. असेच समर्थन करीत असता त्यांनी भारतीय नेत्यांना आव्हान दिले की, भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी याविषयी एकमताने मसुदा तयार करून सरकारकडे द्यावा. सरकार तो पार्लमेंटकडे पाठवेल.

<span;>🏣 लॉर्ड बर्कनहेड यांची अशी कल्पना होती की, भारतीय राजकीय संघटनांत व नेत्यांत एकमत होणे केवळ अशक्य आहे; परंतु त्याची कल्पना चुकीची ठरली. भारताने ते आव्हान स्वीकारले व काँग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा इत्यादि राजकीय संघटनांची सर्वपक्षीय परिषद मुंबईत डॉ. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे 1928 रोजी भरविण्यात आली.

<span;>📜 भारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरविण्यासाठी परिषदेने पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीत सर तेजबहादूर सप्रू, सर अली इमाम, बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस इत्यादि व्यक्ती घेण्यात आल्या.

<span;>📝 समितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास व चर्चा करून आपला अहवाल तयार केला. समितीने मध्यबिंदू गाठला. साम्राज्यांतर्गत स्वराज्य भारताला लगेच मिळावे व नंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण स्वातंत्र्यांची असावी असे समितीने निश्चित केले.

<span;>⏳ नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय सभा भरली (डिसेंबर 1928). मुस्लीम लीगच्या वतीने बॅ. जीनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या, जवळ-जवळ त्या सर्व फेटाळण्यात आल्या. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या हक्कावर पानी सोडण्यास मुस्लीम लीग तयार नव्हती.

<span;>♟ केंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधीत्व जातीय पायावर हवे होते. मार्च 1929 मध्ये लीगने अधिवेशन भरवून त्यात काही अटींवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. खुद्द काँग्रेसमध्येही नेहरू रिपोर्टवर मोठा वाद झाला. पं. जवाहरलाल व सुभाषचंद्र बोस यांनी ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ या ताबडतोबीच्या ध्येयाचा आग्रह धरला.

<span;>📃 महात्माजींनी मध्यस्थी करून काँग्रेसला एकमताने नेहरू रिपोर्टचा स्वीकार करावयास लावला आणि त्याची अंमलबजावणी सरकारने 1929 हे वर्ष संपण्यापूर्वी करावी, असा ठराव पास करून घेतला. त्यामुळे जवाहरलाल व बोस यांच्या सारखे तरुण नेते थोडे शांत झाले.

<span;>⛲️ गांधीजी पुन्हा आता राजकारणाकडे वळले. एका वर्षाच्या अवधीत साम्राज्यांतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वातंत्र्य आंदोलन उभारणार होते..
<span;>

🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button