अमळनेर (प्रतिनिधी) लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित, मंगरुळ येथील सी.बी.एस.ई. सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चेअरमन सुरेंद्र बोहरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्या डॉ. मंजुळा नायर , संचालक आशिष बोहरा, शाळेच्या एक्सीकेटीव्ह अॅड. आशाताई, डॉ. सोनम बोहरा, आर्किटेक दिव्या बोहरा, कशिष बोहरा, प्रतिभा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य नायर यांनी विद्यार्थ्यांना आॅनलाईन देशाच्या स्वातंत्र्यासाठी थोर महात्म्यांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. शिक्षक मोहंती, ज्योत्स्ना गजरे, जुली खंगार, अनिता मोरे, ऍडमिनिस्ट्रेटर नयना कुलकर्णी यांनी सहकार्य केले.