खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात जोरदार पाऊस, पिकांना जीवदान, बळीराजा सुखावला

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरासह तालुक्यात मंगळवारी पावासने जोरदार हजेरी लावली. त्यामुले बळीराजा सुखावला असून पिकांना जीवदान मिळाले आहे. तब्बल दोन महिन्याच्या दडीनंतर पावसाने हजेरी लावल्याने वातावारणात गारवा निर्माण होऊन प्रफुल्लीत वातावरण निर्माण झाले होते.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास कळमसरे ,मारवड परिसरात पावसाला सुरुवात झाली. तर टाकरखेडा , शिरूड ,मंगरूळ , मारवड , डांगरी , बोहरा, कळमसरे , वासरे , खेडी , निम , तांदळी ,धार , देवळी , गांधली , आमोदा, तासखेडा आदी गावांना बोरी काठावर  जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरात तासभर जोरदार पाऊस सूर होता वातावरणात गारवा निर्माण झाला होता. २८ जून रोजी ४१ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर दीड महिन्यात फक्त ८० मिमी पाऊस पडला. १७ ऑगस्ट पर्यंत फक्त १२२ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. जनावरांना चारा नव्हता, अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती.
आजच्या पावसाने आंनद दिला मात्र पाऊस पडूनही कुपोषित पिके उत्पन्न देतील याची शाश्वती नाही.मात्र रब्बी पिकांना त्याचा फायदा होईल आणि जनावरांना चारा मिळणार आहे. पाणी टंचाई दूर होण्यासाठी आणखी जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button