ठेकेदारावर राजपुतांनी साधली कृपा साडेसहा कोटीतून भरला स्वतःचा खिसा
अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर बांधकाम विभागातील टक्केवारीची पाळेमुळेही एक्झिक्युटिव्ह एम.एम. राजपूतांपर्यंत येऊन पोहचत असल्याने त्यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातुन कलटी मारली असली तरी त्यांचे अनेक प्रकरणे आता उघडी होऊ लागली आहे. त्यात मांडळ येथे पांझरा नदीवर उभारलेला पुलाच्या निधीवर त्यांनी टक्केवारीचा घाट घातल्यानेच या पुलाचे काम निकृष्ट झाले आहे. यामुळे भविष्यात हा पुलावरून निष्पापांचे जीव जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यापुलाच्या गुणवत्तेचीही आता वरिष्ठ स्तरावरून चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अमळनेर बांधकाम विभागातील अभियंते लाच घेताना अडकल्याने कोणी कोणत्या कामात, किती आणि कशी टक्केवारी घेतली याचे किस्से आता खबरीलालच्या हाती लागले आहेत. म्हणून टक्केवारीतील खरे झारीतील शुक्रचार्य एक्झिक्युटिव्ह राजपूत हेच असल्याचे समोर येत आहे. कोणत्याही कामाची गुणवत्ता आणि त्याची जबाबदारी ही एक्झिक्युटिव्ह असल्याने राजपूत हे या टक्केवारीच्या आणि लाचेच्या प्रकरणापासून लांब जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे हातधुऊन लागणार आहे. त्यात अभियंता एम. एस. राजपूत यांच्या धुळे आणि जळगाव जिल्ह्याला जोडणारा अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीवर उभारण्यात आलेल्या मांडळ येथील पूलाचे बांधकामाही त्यांच्याच आशीर्वादाने कन्ट्रक्शनच्या ठेकेदाराने निकृष्टपणे केले आहे. विशेषतः टेंडर प्रक्रियेत नमूद करण्यात आलेल्या बांधकामाच्या स्वरूपात बदल करून पूल उभारण्यात आला आहे, पुलाचा पाया बांधतांना निविदानुसार घालून दिलेल्या अटी शर्तीचा पूर्णपणे भंग झालेला आहे. त्यामुळे या पुलाला भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यातून अनेक निष्पापांचे जीव गेल्यास याची राजपूत यांच्यावरच जबाबदारी निश्चित होणार आहे.
अधिकच्या टक्केवारीसाठी बदलला “जेई”..
मांडळ येथे पांझरा नदीवर साडे सहा कोटीचा पुल उभारला आहे. यातून केवळ अधिकची टक्केवारी लाटण्यासाठी कार्यकारी अभियंता राजपूत यांनी कनिष्ठ अभियंता साळुंखे यांच्या जागी संजय पाटील जे ई यांना नेमले. विशेष म्हणजे या कन्ट्रक्शनच्या ठेकेदाराने यापूर्वी अमळनेर तालुक्यात अनेक बोगस कामे केली आहेत, ती फक्त या कार्यकारी अभियंत्यांच्या आशिर्वादामुळे त्यामुळे अमळनेरातून जेवढी लुट करता येईल, तेवढी लुट करीत राजपूत यांनी एक्झिट केली आहे.
V nice information sirji