खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;>*◾️ फूल ज्या ठिकाणी देठाला येते, तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार (Receptacle) असे म्हणतात.

<span;>◾️फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात.

<span;>🌸 निदलपुंज (Calyx) : कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.

<span;>🌸 दलपुंज (Corolla) : दलपुंज पाकळ्यांनी (Petals) बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर

<span;>🌸 पुमंग (Androecium) : फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा (Stamen) बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात.

<span;>🌸 जायांग : (Gynoecium) : फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो त्यात कुक्षी, कुक्षी वृत व अंडाशय असते.

<span;>🔰 परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन (Pollination) असे म्हणतात. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील
<span;>📌 बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बी मध्ये होते, तर
<span;>📌 अंडाशयाचे रूपांतर फळात होते.

<span;>*✅✅ काही महत्त्वाचे एकक ✅✅ #Science

<span;>☑️ एककाचे नाव – वापर

<span;>🏆 नॉट :- सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक

<span;>1 नॉटिकल मैल=6076 फुट

<span;>🏆 फॅदम – समुद्राची खोली मोजण्याचे एकक

<span;>1 फॅदम=6 फुट

<span;>🏆 प्रकाशवर्ष :- तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक

<span;>1 प्रकाशवर्ष=9.46×10१२ मीटर

<span;>🏆 अँगस्ट्रॉंम :- प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक

<span;>1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर

<span;>🏆 बार :- वायुदाब मोजण्याचे एकक

<span;>1 बार=10 डाईन्स दाब/चौ

<span;>🏆 पौंड :- वजन मोजण्याचे एकक

<span;>2000 पौंड=1 टन

<span;>🏆 कॅलरी :- उष्णता मोजण्याचे एकक

<span;>1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा

<span;>🏆 अॅम्पीअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक

<span;>1 अॅम्पीअर=6.3×10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद

<span;>🏆 मायक्रोन :- लांबीचे वैज्ञानिक एकक

<span;>1 मायक्रोन=0.001 मिमी

<span;>🏆 हँड :- घोड्याची उंची मोजण्याचे एकक

<span;>1 हँड=4 इंच

<span;>🏆 गाठ :- कापूस गाठी मोजण्याचे एकक

<span;>1 गाठ=500 पौंड

<span;>🏆 रोएंटजेन :- क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक

<span;>🏆 वॅट :- शक्तीचे एकक

<span;>1 हॉर्सपॉवर=746 वॅट

<span;>🏆 हॉर्सपॉवर :- स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक

<span;>1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे.

<span;>🏆 दस्ता :- कागदसंख्या मोजण्याचे एकक

<span;>1 दस्ता=24 कागद,

<span;>1 रिम=20 दस्ते

<span;>🏆 एकर :- जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक

<span;>1 एकर = 43560 चौ.फुट

<span;>🏆 मैल :-अंतर मोजण्याचे एकक

<span;>1 मैल=1609.35 मीटर

<span;>🏆 हर्टझ :- विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक

<span;>=======================

<span;>✅ पर्यावरणासंबंधी काही महत्त्वपूर्ण दिवस. #Day

<span;>⭐ ०२ फेब्रुवारी : जागतिक पाणथळ दिन
<span;>🐻 ०३ मार्च : जागतिक वन्यजीव दिन
<span;>🌊 १४ मार्च : नद्यांसाठी कृती दिन
<span;>🌳 २१ मार्च : जागतिक वन दिन
<span;>💧 २२ मार्च : जागतिक जल दिन
<span;>☂️ २३ मार्च : जागतिक हवामान दिन
<span;>🌍 २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
<span;>🐟 २२ मे : जागतिक जैवविविधता दिन
<span;>🌴 ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन
<span;>🌊 ०८ जून : जागतिक समुद्र दिन
<span;>🍃 १५ जून : जागतिक वारा दिन
<span;>🏜️ १७ जून : वाळवंटीकरण प्रतिरोध दिन
<span;>🌳 २८ जुलै : पर्यावरण संवर्धन दिन
<span;>⭐ ३१ जुलै : जागतिक रेंजर दिन
<span;>👨‍🔬 १० ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय जैवइंधन दिन
<span;>⭐ १६ सप्टेंबर : जागतिक ओझोन दिन
<span;>🦁 ०४ ऑक्टोबर : जागतिक प्राणी दिन
<span;>🏭 ०२ डिसेंबर : राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन
<span;>🌐 ०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन
<span;>⛰️ ११ डिसेंबर : जागतिक पर्वत दिन
<span;>☀️ १४ डिसेंबर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन

<span;>============================

<span;>*📚 *History Special*📚
<span;>▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

<span;>●◆*1857 च्या उठावातील महत्त्वाची ठिकाणे*◆●
<span;>••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

<span;>मागील दोन लेखात आपण मीरत,दिल्ली,कानपूर आणि लखनौ येथील उठाव पाहिले आज आपण बिहार आणि झांशी येथील उठाव पाहूयात.

<span;>                  *◆★बिहार★◆*

<span;>◆ पाटणजवळ दानापूर येथे ब्रिटिशांनी फौज होती येथील ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या छावणीतील हिंदी शिपायांत उठावाची लागण होऊ नये म्हणून त्याने शिपायांना निशस्त्र करण्याचा निर्णय घेतला हिंदी सैनिक शस्त्रे खाली ठेवण्यास आणि गोर्‍यांची फौज तेथे येण्यास एकच गाठ पडली.

<span;>◆ आपणास नि:शस्त्र करुन लॉईड आपली कत्तल करणार अशी भीती हिंदी शिपायांना वाटल्याने त्यांनी हाती शस्त्रें घेतले व गोर्‍या फौजेवर गोळीबार सुरु केला.

<span;>◆ र्लॉडड हतबल झाला. त्यांची जमीनदार राणा कुंवरसिंग ब्रिटिशांच्या विरोधात बंड करुन उठला.

<span;>◆ इंग्रजांकडून झालेल्या अन्यायाची संधीच उठावाच्या रुपाने राणा कुवरसिंहाला चालून आली.

<span;>◆ उठाववाल्यांनाही कुंवरसिंहाच्या रुपाने नेता मिळाला इंग्रजांशी त्यांनी दिलेला लढा तरुणांनाही लाजवेल असा होता.

<span;>◆ब्रिटिशांशी लढता लढता इ.स. 1857 मध्ये कुंवरसिंह मरण पावला.
<span;>÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

<span;>               *◆★झाशी★◆*

<span;>◆ र्लॉड डलहौसीने दत्ताक वारस नामंजूर या तत्वाखाली झाशीचे राज्य खालसा केले राणीच्या दत्ताक पुत्रास राज्याधिकार नाकारन्यात आला आपल्या मुलाच्या मुंजीसाठी आपल्याचा खजिन्यातील 1 लाख रुपयांची मागणी राणीने इंग्रजाकडे केली.

<span;>◆ इंग्रजांनी यासाठी जामीन मागितला यामुळे राणी अपमानित झाली व तिने हाती शस्त्र घेतले उठावाची वार्ता जसजशी समजेल तस-तसे उठावाचे लोण पसरत होते.

<span;>◆ 6 जून 1857 रोजी झाशी येथील हिंदी शिपायांनी बंड पुकारून इंग्रज अधिकार्‍यांची कत्तल केली. यामागे राणीचा हात आहे. असे वाटून इंग्रजांनी राणीच्या विरोधात हालचाली सुरु केल्या.

<span;>◆ इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यास वेढा दिला. राणी मोठया निर्धाराने किल्ला लढवू लागली राणीच्या मदतीस तात्या टोपे धावून आले.

<span;>◆ पण त्यांना पराभवास सामोरे जोवे लागले ब्रिटिश सेनापती सर हयूरोज याने किल्ल्याच्या तटबंदीस खिंडार पाडलें इंग्रजांनी किल्ल्यात प्रवेश करताच भयंकर कतल सुरु केली.

<span;>◆ मोठया युक्तीने आपल्या मुलाला पाठीशी बांधून घोडयावर स्वार होऊन राणी किल्ल्याबाहेर पडली.

<span;>◆ काल्पीच्या दिशेने राणीची दौड सुरु झाली.

<span;>◆ 100 मैलाचे अंतर राणीने वार्‍याच्या वेगाने पार केले.

<span;>◆ झाशीची राणी लक्ष्मीबाई काल्पीला येताच नानासाहेब पेशवे तात्या टोपे, बांद्याचा नवाब इ. नेते एकत्र आले.

<span;>◆ ब्रिटिश सेनापती सर हयू रोज यांच्या मागावर होता त्याने काल्पीवर आक्रमण केले.

<span;>◆ बंडवाले आणि इंग्रज यांच्यात दोन लढाया झाल्या पण त्यात बंडवाल्यांचा पराभव झाला. राणी आणि तात्या टोपे यांनी ग्वाल्हेरकडे कूच केले.

<span;>◆ राणी व तात्या टोपे ग्वाल्हेरला येताच तेथील सैनिकात उत्साह संचारला व त्यांनी बंडाचे निशान उभारले यावेळी ग्वाल्हेरचा राजा जयाजीराव मात्र आगर्‍यास पळून गेला.

<span;>◆ ग्वाल्हेरचा किल्ला जून 1858 मध्ये बंडवाल्यांच्या ताब्यात आला.

<span;>◆ ग्वाल्हेरच्या बंडाची बातमी समजाताच सर ह्यूरोज काल्पीहून ग्वाल्हेरला आला राणी, तात्या टोपे व इंग्रज यांचा जणू पाठशिवणीचा खेळ सुरु होता.

<span;>◆ ग्वाल्हेर जिंकणे इंग्रजाना आवश्यक वाटू लागले.

<span;>◆ त्यांनी बंडवाल्यांवर आक्रमण केले यावेळी राणी लक्ष्मीबाई उठावाचे स्वत: नेतृत्व करत होती सर ह्यूरोज व जनरल स्मिथ यांच्या भेदक मार्‍यापुढे उठाववाल्यांचा निभाव लागेनासा झाला राणीला शत्रूने वेढा दिला.

<span;>◆ राणीने मोठया चपळतेने घोडा उडवून वेढयाचा छेद केला.

<span;>◆ ब्रिटिश फौज पाठीवर होतीच अशा आणीबाणीच्या प्रसंगी एका ओढयाजवळ राणीचा घोडा अडला पाठलाग करणार्‍या इंग्रज सैनिकांनी राणीच्या डोक्यावर छातीवर जबर वार केले.

<span;>◆ राणीने पराक्रमाची शर्थ केली.

<span;>◆ मृत्यूला कवटाळण्यापूर्वी राणीने वार करणार्‍या दोन शत्रू सैनिकांना ठार केले.

<span;>◆राणीच्या मृत्यूने 17 जून 1858 उठावाच्या एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला.

<span;>लक्षात असू द्या:- मणिकर्णिका:- द क्वीन ऑफ झांशी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे तो राणी वर आधारित आहे.

<span;>राणीची भूमिका:- अभिनेत्री कंगना रनौट.

<span;>▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

<span;>✅✅ राजधानी एक्स्प्रेसला तेजसचे नवे सुधारित रेक्स जोडून गाडी चालवण्यास पश्चिम रेल्वेने केली सुरुवात. ✅✅ #Railway

<span;>🚝  खास ‘तेजस’ प्रकारचे स्मार्ट शयनयान पद्धतीचे डबे असणाऱ्या पहिल्या रेकचा भारतीय रेल्वेमध्ये समावेश..

<span;>🚄 नवीन सुधारित ‘तेजस’ प्रकारचे शयनयान रेक्स (रेल्वेच्या डब्यांची इंजिनविरहित शृंखला) समाविष्ट करत पश्चिम रेल्वे अतिशय आरामदायक अशा रेल्वेप्रवासाच्या प्रचीतीचे नवे पर्व सुरु करत आहे.

<span;>🚅 अद्ययावत ‘स्मार्ट’ सुविधांनी युक्त असे हे झळझळीत सोनेरी रंगाचे डबे, पश्चिम रेल्वेच्या लब्धप्रतिष्ठित अशा मुंबई राजधानी एक्स्प्रेसला जोडले जात आहेत.

<span;>🚈 या डब्यांमुळे उच्चभ्रू अशा थाटाचा प्रवास-अनुभव मिळू शकणार आहे. या दिमाखदार नव्या रेकने  दि.19 जुलै 2021 रोजी आपला पहिला प्रवास सुरु केला.

<span;>✅✅ भारताला नेपाळसोबत जोडणारा ‘जयनगर-कुर्था रेल्वे मार्ग’. ✅✅ #Railway

<span;>🚆 इरकॉन इंटरनेशनल लिमिटेड (इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड / IRCON) या कंपनीने भारत आणि नेपाळ या देशांच्या दरम्यान ‘जयनगर-कुर्था रेल्वे मार्ग’ तयार केला आहे.

<span;>🚇 18 जुलै 2021 रोजी या मार्गावर रेलगाडी चालवण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

<span;>🚃 34.50 किलोमीटर लांबीच्या या मार्गाने भारतातील जयनगर (मधुबनी जिल्हा, बिहार) आणि नेपाळमधील कुर्था ही गावे जोडली गेली आहेत.

<span;>🌠 नेपाळ देश :
<span;>नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन देशाची सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे.

<span;>🌁 नेपाळ हा आयताक्रुती राष्ट्रध्वज नसलेला जगातला एकमेव देश आहे. काठमांडू हे नेपाळचे राजधानी शहर आहे आणि नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.

<span;>🌁 उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातले सर्वोच्च शिखर म्हणजेच ‘एव्हरेस्ट’ नेपाळमध्ये आहे.

<span;>🌐GENERAL KNOWLEDGE🧠*

<span;>Q1) कोणत्या व्यक्तीची आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झाली?
<span;>उत्तर :- हेमंत बिस्वा सरमा

<span;>Q2) कोणत्या व्यक्तीने ‘2021 लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर’ हा पुरस्कार जिंकला?
<span;>उत्तर :-  राफेल नदाल

<span;>Q3) कोणता देश द्वितीय विश्वयुद्धात जर्मनी देशाने आत्मसमर्पण केल्याचा दिवस ‘विजय दिन’ म्हणून साजरा करतो?
<span;>उत्तर :- रशिया

<span;>Q4) कोणत्या संस्थेने ‘नेचर इन ए ग्लोबलाइज्ड वर्ल्डः कन्फ्लिक्ट अँड कन्झर्वेशन’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
<span;>उत्तर :- IUCN

<span;>Q5) हिंद महासागरात अनियंत्रित स्थितीत पडलेला ‘लाँग मार्च 5B’ अग्निबाण कोणत्या देशाचा आहे?
<span;>उत्तर :- चीन

<span;>Q6) विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक सामाजिक कल्याणसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) तयार केलेल्या मोबाइल अॅपचे नाव काय आहे?
<span;>उत्तर :-  CBSE दोस्त फॉर लाइफ

<span;>Q7) राजकीय आणि धार्मिक संस्थांना SSE मंचाद्वारे निधी उभा करण्यास परवानगी न देण्याची शिफारस करण्यात आलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंज (SSE) या मंचांच्या संदर्भातील तांत्रिक गटाचे अध्यक्ष कोण आहेत?
<span;>उत्तर :-  हर्ष कुमार भानवाला

<span;>Q8) कोणत्या राज्यात ‘हक्की पिक्की’ ही आदिवासी जमाती आढळते?
<span;>उत्तर :-  कर्नाटक

<span;>Q9) कोणते जल जीवन अभियानाच्या अंतर्गत ‘हर घर जल’ संकल्प पूर्ण करणारे दुसरे केंद्रशासित प्रदेश ठरले?
<span;>उत्तर :-  पुडुचेरी

<span;>Q10) कोणत्या संस्थेने “कनेक्टेड कॉमर्स: क्रिएटिंग ए रोडमॅप फॉर ए डिजिटली इंक्लूसिव भारत” या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?
<span;>उत्तर :- नीती आयोग

<span;>: 🏟️ विशेष : टोकियो ऑलिंपिक स्पर्धा २०२०

<span;>🐎 २०२० ऑलिंपिक मधील वयोवृद्ध खेळाडू
<span;>👩 मेरी हॅना (६६) : घोडेस्वारी : ऑस्ट्रेलिया

<span;>🏟️ त्या सहाव्यांदा ऑलिंपिकमध्ये सहभागी ,
<span;>📌 १९९६ मध्ये त्या पहिल्यांदा सहभागी

<span;>🏓 २०२० ऑलिंपिक मधील तरुण खेळाडू
<span;>👧 हेंड जाजा (१२) : टेबल टेनिस : सिरीया

<span;>🐎 २०२० ऑलिंपिक वयोवृद्ध (पुरुष) खेळाडू
<span;>👨‍🦳 एंड्र्यू होय (६२) : घोडेस्वार : ऑस्ट्रेलिया

<span;>🇮🇳 ऑलिंपिक पदार्पण करणारी भारताची
<span;>सर्वात वयोवृद्ध खेळाडू : तेजस्विनी सावंत (४०)

<span;>: 🌺🌺मॅक्रॉन यांच्यासह १४ राष्ट्रप्रमुखांवर पाळत.🌺🌺

<span;>🔰इस्राायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह सध्याच्या १४ राष्ट्रप्रमुखांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाइलमधील संभाषण, संदेश व इतर सगळी माहिती उघड करीत असते.

<span;>🔰मॅक्रॉन यांच्यासह १४ जणांचे मोबाइल फोन हॅक करण्यात आले होते. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अ‍ॅग्नेस कॉलामार्ड यांनी सांगितले, की ही अतिशय धक्कादायक बाब असून त्यामुळे जागतिक नेत्यांना धक्का बसला आहे. पन्नास हजार फोनमधील माहिती या स्पायवेअरच्या मदतीने उघड करण्यात आली आहे. पॅरिस येथील ‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी म्हटले आहे, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोसा, इराकचे बरहाम सलिह, मोरोक्कोचे राजे महंमद-सहावे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली, मोरोक्कोचे पंतप्रधान साद एडिन ओथमानी यांचाही यादीत समावेश आहे, असे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. या राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे मोेबाइल फोन तपासणीसाठी दिलेले नाहीत.

<span;>🔰एनएसओचे पेगॅसस हे स्पायवेअर लष्करी दर्जाचे असून जागतिक माध्यम समूहाच्या १६ सदस्यांनी हा प्रकार उघड केला होता. २०१९ मध्ये मॅक्रॉन यांच्यासह मंत्रिमंडळातील पंधरा जण या स्पायवेअरच्या हिटलिस्टवर होते, असे ‘ल माँद’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. पॅरिसच्या अभियोक्ता कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अ‍ॅमेझॉन वेब सव्र्हिसेस या कंपनीने एनएसओला यात डिजिटल ओशनच्या माध्यमातून सव्र्हरची मदत केली होती. डिजिटल ओशन या कंपनीने आरोप फेटाळले किंवा स्वीकारलेले नाहीत, असे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.

<span;> 🎯आकाश-NG’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी..

<span;>☄संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) 21 जुलै 2021 रोजी पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या ‘आकाश-NG’ अर्थात ‘न्यू जनरेशन आकाश’ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर यशस्वी चाचणी केली.

<span;>☄ही क्षेपणास्त्र प्रणाली DRDO संस्थेच्या हैदराबाद येथील संरक्षण, संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने (DRDL) विकसित केली आहे. या चाचणीदरम्यान, शत्रूच्या हवेतील हल्ल्याला हवेतच निष्प्रभ करण्याची गतिमानता या क्षेपणास्त्रात असल्याचे सिध्द झाले आहे.

<span;>🔰आकाश क्षेपणास्त्र..

<span;>☄आकाश क्षेपणास्त्राला भारतीय लष्करात जमिनीवरून हवेत कमी पल्ल्याची मारक क्षमता असणारे क्षेपणास्त्र (SRSTM) म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. हे पहिले SAM आहे, ज्यामध्ये रेडियो तरंगांच्या आधारावर आपल्या लक्ष्यला भेदण्यास स्वदेशी तंत्रज्ञान युक्त प्रणालीचा वापर केला गेला आहे.

<span;>☄हे भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र असून त्याचा मारा पल्ला 60 किलोमीटरपर्यंत आहे. ते 55 किलोग्राम स्फोटके घेऊन प्रवास करू शकते. या क्षेपणास्त्रात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. ध्वनीच्या साडेतीनपट वेगाने हे क्षेपणास्त्र प्रवास करते.

<span;>🔰DRDO विषयी…

<span;>☄संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारताच्या संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी समर्पित असलेली प्रमुख संस्था आहे. त्याची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही संस्था भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

<span;> 🌺🌺भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (कॉर्पोरेट व्यक्तींसाठी नादारी तोडगा प्रक्रिया) नियमन-2016’ यामध्ये दुरुस्ती.🌺🌺

<span;>☑️भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (IBBI) यांनी ‘भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (कॉर्पोरेट व्यक्तींसाठी नादारी तोडगा प्रक्रिया) नियमन-2016’ यामध्ये दुरुस्ती केली आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत –

<span;>☑️कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्ज थकवलेल्या उद्योजकाने, नादारी प्रक्रियेची सुरुवात करण्यापूर्वी आपले नाव किंवा आपला नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यात बदल केला असेल तर इतर भागधारकांचा नवीन नाव अथवा नवीन नोंदणीकृत कार्यालयाशी संबंध नसल्यास, कदाचित ते कॉर्पोरेट नादारी निराकरण प्रक्रिया (CIRP) यामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत.

<span;>☑️ नवीन सुधारणेनुसार, CIRP प्रक्रिया करणाऱ्या नादारी व्यावसायिकांनी ही प्रक्रिया सुरु होण्याच्या दोन वर्षाआधी संबंधित कंपनीने बदलवलेली नावे आणि पत्ते रद्द करण्याची आवश्यकता असेल. तसेच, सध्या असलेले नाव आणि नोंदणीकृत पत्ताही रद्द करून नवीन नावे तसेच पत्त्यावर झालेला सर्व पत्रव्यवहार आणि कागदोपत्री नोंदी देखील रद्द कराव्या लागतील.

<span;>☑️हंगामी तोडगा व्यावसायिक (IRP) अथवा तोडगा व्यावसायिकाने (RP) CIRP याची प्रक्रिया करताना आपल्या मदतीसाठी सहायक व्यावसायिक, ज्यात नोंदणीकृत मूल्यांकन व्यावसायिकांचाही समावेश असेल, त्यांची नेमणूक करू शकतील, अशी तरतूद आहे

<span;>: ********************************

<span;>*२३ जुलै – स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मी सेहगल स्मृतिदिन*

<span;>********************************

<span;>जन्म – २४ ऑक्टोबर १९१४ (चेन्नई)
<span;>स्मृती – २३ जुलै २०१२

<span;>कॅप्टन लक्ष्मी सेहगल या आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी.

<span;>लक्ष्मी सेहगल यांचा जन्म एका परंपरावादी तामीळ परिवारात झाला. लक्ष्मी सेहगल यांचे वडील डॉ.एस. स्वामीनाथन हे प्रख्यात वकील होते, तर आई अमू स्वामीनाथन या सामाजिक कार्यकर्त्या होत्या.

<span;>लहानपणापासूनच राष्ट्रीय आंदोलनांनी त्या प्रभावित होत असत. महात्मा गांधी यांनी विदेशी वस्तूंच्या बहिष्कार करणारे आंदोलन केले तेव्हा लक्ष्मी सेहगल त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. देशसेवेची आवड असणार्या सेहगल यांनी १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेज मध्ये त्यांनी मेडिकल विषयात शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या. डॉक्टरकीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी १९४० मध्ये त्या सिंगापूरला गेल्या. तेथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या संपर्कात त्या आल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महिलांसाठी ‘राणी झाशी रेजिमेंट’ ची स्थापना केली. लक्ष्मी सेहगल यांची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. सेहगल यांनी कर्नल पदापर्यंत बढती मिळविली पण त्यांची ‘कॅप्टन’ ही ओळख अखेरपर्यंत कायम राहिली. स्वातंत्र्यसमरात आणि नंतर समाजकारणात मोठे योगदान देणार्या या कर्तृत्वशाली वीरांगनेने जगासमोर स्वत: चा आदर्श निर्माण केला.

<span;>दुसर्या महायुद्धाच्या वेळी जपानी सेनानी सिंगापूर मध्ये ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला तेव्हा लक्ष्मी सेहगल सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये सहभागी झाल्या. १९४३ साली आझाद हिंद सरकारच्या कॅबिनेट मध्ये पहिली महिला सदस्या होण्याचा मान त्यांनी पटकाविला. आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेजिमेंट मध्ये लक्ष्मी सेहगल या नेहमीच सक्रिय राहिल्या. त्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button