खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🔴 साक्षरता टक्केवारी 🔴

❇️सर्वात कमी

🔳नंदुरबार:-64.04%

🔳गडचिरोली:-70.55%

🔳बीड:-73.53%

🔳जालना:-73.61%

🔳धुळे:-74.61%

❇️सर्वात जास्त:-

🔳मुंबई उपनगर:-90.90%

🔳नागपूर:-89.52%

🔳मुंबई शहर:-88.48%

🔳अमरावती:-88.23%

🔳अकोला:-87.55%

माझी MPSC BY RAJPUT SIR

🔴 सारख्या नावाचे तालुके 🔴

❇️तालुका व जिल्हा❇️

🔳आष्टी:-बीड-वर्धा

🔳शिरूर:-बीड-पुणे

🔳कळंब:-यवतमाळ-उस्मानाबाद

🔳खेड:-पुणे-रत्नागिरी

🔳कर्जत:-नगर-रायगड

🔳मालेगाव:-वाशीम-नाशिक

🔳कारंजा:-वाशीम-वर्धा

🔳सेलू:-वर्धा-परभणी

🔳नांदगाव:-नाशिक-अमरावती

🌎🌍 दिनविशेष 🌍🌎

🌅🌅 ३ जुलै– घटना 🌅🌅 #DinVishesh

⚜ १६०८: सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली.

१८५०: ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

⚜ १८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली. #Modern #History #1st

⚜ १८५५: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.

⚜ १८८४: डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.

⚜ १८८६: जर्मनीच्या कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली. #World1st

⚜ १८९०: ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.

⚜ १९२८: लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.

⚜ १९३८: मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी २०२ किमी वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

⚜ १९९८: कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

⚜ २०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.

⚜ २००१: सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

⚜ २००६: एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.

🌅🌅 ३ जूलै – जन्म 🌅🌅

⚜ १६८३: इंग्लिश कवी एडवर्ड यंग यांचे जन्म.

⚜ १८३८: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)

⚜ १८८६: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९५७)

⚜ १९०९: कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००४)

⚜ १९१२: मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७७)

⚜ १९१४: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)

⚜ १९१८:भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. रंगारा राव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९७४)

⚜ १९२४: तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे ६वे राष्ट्राध्यक्ष सेल्लप्पन रामनाथन यांचा जन्म.

⚜ १९२४: भारतीय क्रिकेटपटू अर्जुन नायडू यांचा जन्म.

⚜ १९२६: लेखिका स्वातंत्र्य सैनिक सुनीता देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)

⚜ १९५१: न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू सर रिचर्ड हॅडली यांचा जन्म.

⚜ १९५२: भारतीय गायक अमित कुमार यांचा जन्म.

⚜ १९५२: भारतीय कॅनेडियन लेखक रोहिनटन मिस्त्री यांचा जन्म.

⚜ १९७१: विकीलीक्स चे संस्थापक ज्युलियन असांज यांचा जन्म. #GK #WorldGK

⚜ १९८०: भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा जन्म.

🌅🌅 ३ जुलै – मृत्यू 🌅🌅

⚜ १३५०: संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ ऑक्टोबर १२७०)

⚜ १९३३: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचे निधन. (जम: १२ जुलै १८५२)

⚜ १९३५: सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८७८)

⚜ १९६९: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक ब्रायन जोन्स यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)

⚜ १९९६: हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२६) l

🏆🏆 ‘भारत नेट’ योजनेंतर्गत गावागावांमध्ये इंटरनेट 🏆🏆
#Scheme

🔮१६ राज्यांमधील ३ लाख ६१ हजार गावांमध्ये इंटरनेट ब्रॉडबॅण्डची सुविधा पोहोचवण्यासाठी १९ हजार कोटी तर, वीज वितरण क्षेत्रातील सुधारणांसाठी ३ लाख कोटींच्या खर्चाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या शिवाय, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या अन्य योजनांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले.

🔮गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ६ लाख गावे १ हजार दिवसांमध्ये इंटरनेटने जोडली जातील अशी घोषणा केली होती.

🔮गरीब कल्याण धान्य योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनीच दोन आठवड्यांपूर्वी केली होती. त्यासाठी केंद्राने ९३ हजार कोटींची तरतूद केली असून ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरवले जात आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या १.१० लाख कोटींच्या कर्जहमी योजनेलाही मंजुरी देण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकूण ६.२८ लाख कोटींच्या योजना जाहीर केल्या होत्या.

🔮वीज वितरण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्राने राज्यांना आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. वीज ऊर्जा क्षेत्रासाठी ३.०३ लाख कोटींना मंजुरी देण्यात आली. मोठ्या शहरात स्वयंचलित यंत्रणा लागू करणे, सौर ऊर्जा यंत्रणेचा विस्तार करणे, गरिबांना प्रतिदिन रिचार्ज यंत्रणा लागू करणे आदी सुधारणा केल्या जाणार आहेत.

✅ आत्मनिर्भर भारत ✅
#Scheme

अभियानाच्या अतंर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग उन्नती योजनेला एक वर्ष पूर्ण

🌻अन्न प्रक्रीया उद्योगातील असंघटित गटात सध्या व्यक्तिगत पातळीवर कार्यरत सूक्ष्‍म उद्योगात स्पर्धा वाढवणे आणि या क्षेत्राला प्रोत्‍साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून आत्‍मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत केंद्र-पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्‍म अन्न उद्योग उन्‍नती योजनेने (PMFME) एक वर्ष पूर्ण केले आहे.

योजनेची कामगिरी

🌻योजनेच्या ‘एक जिल्हा एक उत्‍पादन’ (ODOP) घटकाच्या अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने राज्‍ये/ केंद्रशासित प्रदेशांद्वारे प्राप्‍त शिफारशीनुसार 137 वैशिष्ट्यपूर्ण उत्‍पादनांसह 35 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांतील 707 जिल्ह्यांकरीता ODOPला मंजूरी दिली आहे.

🌻योजनेच्या अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने ग्राम विकास मंत्रालय, आदिवासी कार्य मंत्रालय आणि गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय यांच्यासोबत तीन संयुक्‍त पत्रांवर स्वाक्षरी केली आहे.

🌻योजनेच्या नोडल बँकेच्या रुपात यूनियन बँक ऑफ इंडिया सोबत एक करार केला आहे. 11 बँकासह योजनेकरीता आधिकृत कर्ज घेणाऱ्या भागीदारांच्या रुपात करारपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

🌻योजनेच्या अतंर्गत, क्षमता बांधणी घटकाखाली, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM) आणि अन्न प्रक्रीया तंत्रज्ञान संस्था (IIFPT) प्रशिक्षण तसेच संशोधन विषयक सहकार्यात मोलाची भूमिका वठवत आहेत.

🌻 त्याअंतर्गत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 371 तज्ञ प्रशिक्षणार्थीं आणि 469 जिल्हा पातळीवरील प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण घेले असून इतर राज्यात ही प्रक्रीया सुरु आहे.

🌻अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने IIFPT संस्थेच्या सहयोगाने समान अंत:पोषण केन्द्रांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल आणि देशभरात अंत:पोषण केन्द्राच्या तपशीलाच्या सुविधेसाठी एक ऑनलाइन समान अंत:पोषण केंद्र नकाशा विकसित केला आहे.

🌻योजनेच्या अंतर्गत बचत गटांना बीज भांडवल उपलब्ध केले जाते. त्यासाठी राज्य पातळीवर कार्यरत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) आणि राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (SRLMs) सहकार्य घेतले जाते.

🌻 आतापर्यंत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने राज्य नोडल संस्थेला (SNA) 43,086 बचतगट सदस्यांना 123.54 कोटी रुपये भांडवल देण्याची शिफारस केली आहे. राज्य नोडल संस्थेने 8040 सदस्यांना बीज भांडवल मंजूर केले असून 25.25 कोटी रुपयांचे वाटप SRLMला झाले आहे.

🌻प्रत्येकी 10 उत्पादनांच्या विपणन आणि नाममुद्रा प्रचारासाठी NAFED आणि TRIFED या संस्थांच्यासोबत योजनेच्या अतंर्गत सामंजस्य करार केला आहे.

✅✅ *देशातलं पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र पुण्यात सुरू. ✅✅
#1st

🎯 महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्तानं, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, म्हणजेच एमसीसीआयए या संस्थेनं नाबार्डच्या सहकार्यानं स्थापन केलेल्या देशातल्या पहिल्या कृषी निर्यात सुविधा केंद्राचं पुण्यात नुकतंच उद्घाटन झालं.

🎯 कोरोना नियमावलीचं पालन करत नाबार्डच्या पुणे विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक जी. एस. रावत यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. यावेळी ‘एमसीसीआयए’च्या कृषी समितीचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी आणि ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते.

🎯 या केंद्राचं १५ मे रोजी दूर दृश्य प्रणालीच्या स्वरुपात उद्घाटन झालं होतं. आता महाराष्ट्रातल्या कृषी-अन्न उत्पादन क्षेत्रातल्या संभाव्य निर्यातदारांसाठी प्रत्यक्ष सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

🎯 या केंद्राच्या माध्यमातून निर्यातदारांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारचं सहकार्य मिळेल, असं मराठा चेंबरनं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

🎯 आवश्यक आणि योग्य ती माहिती पुरवून, योग्य वेळी मार्गदर्शन करून आणि प्रशिक्षण शिबिरे राबवून राज्यातून कृषी आणि अन्न उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करणं, हा हे सुविधा केंद्र स्थापन करण्यामागचा उद्देश आहे.

🎯 निर्यात प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांच्या, शेतकरी उत्पादक संघटनांच्या, कृषी अन्न प्रक्रिया उद्योगातल्या कंपन्यांच्या आणि नव्या-जुन्या निर्यातदारांना या केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

📑✍ चालू घडामोडी 2 जुलै 2021; वन लायनर नोट्स. 📃 #OneLiner

1. The World UFO Day (WUD) is held on July 2 each year globally.

🔰 जागतिक यूएफओ दिन (WUD) दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक स्तरावर आयोजित केला जातो. #Day

2. World Sports Journalists Day is determined globally on 2nd July every year.

🔰 जागतिक क्रीडा पत्रकार दिन दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. #Day

3. India has been ranked as the tenth excellent country in the world in the Global Cybersecurity Index (GCI) 2020, launched by ITU (International Telecommunication Union).

🔰 ITU (आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ) यांनी सुरू केलेल्या ग्लोबल सायबरसुरिटी इंडेक्स (GCI) 2021मध्ये भारताला जगातील दहावा उत्कृष्ट देश म्हणून स्थान देण्यात आले आहे.

4. The Minister for Social Justice & Empowerment Thawaarchand Gehlot launched the website for the Nasha Mukt Bharat Abhiyaan on the occasion of International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking.

🔰 सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी नशा मुक्ति भारत अभियानासाठी अंमलबजावणी आणि अवैध तस्करीविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त वेबसाइट सुरू केली.

5. Two Ayurveda doctors, who are originally from India’s Kerela state and now based in the United Arab Emirates (UAE), have received the Gulf nation’s coveted Golden Visa.

🔰 मूळचे केरळ राज्यातील आणि आता संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे राहणारे दोन आयुर्वेद डॉक्टरांना आखाती देशांनी गोल्डन व्हिसा मिळाला आहे.

6. GST completed four years of implementation. GST does not tax or regulate specific commodities.

🔰 जीएसटीने अंमलबजावणीची चार वर्षे पूर्ण केली. जीएसटी विशिष्ट वस्तूंवर कर किंवा नियमन करीत नाही.

7. Arun Jaitley National Institute of Financial Management (AJNIFM) and Microsoft have inked a Memorandum of Understanding (MoU) for building an Artificial Intelligence (AI) and emerging technologies Centre of Excellence at AJNIFM.

🔰 अरुण जेटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट (AJNIFM) आणि मायक्रोसॉफ्ट यांनी AJNIFM येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करण्यासाठी सामंजस्य करार केला.

8. Flipkart has launched its new app called ‘Shopsy’ for online business.

🔰 फ्लिपकार्टने ऑनलाइन व्यवसायासाठी ‘शॉपसी’ नावाचे आपले नवीन अ‍ॅप बाजारात आणले आहे.

9. 6th anniversary of Digital India Abhiyan was observed on July 1.  On the occasion, Prime Minister Narendra Modi interacted with beneficiaries of various schemes

🔰 1 जुलै रोजी डिजिटल इंडिया अभियानाचा 6 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

10. Agriculture and Farmers Welfare Minister, Narendra Singh Tomar, has launched the Crop Insurance Awareness Campaign for Fasal Bima Yojana.

🔰 कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी फसल विमा योजनेसाठी पीक विमा जागरूकता अभियान सुरू केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button