खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

शेताच्या बांधावरून डोक्यात उलटी कुऱ्हाड टाकून केले रक्तभंबाळ

लोंढवे येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोंढवे येथे शेताच्या बांधावरून वाद झाल्याची घटना १६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यात चौघांनी एकाच्या डोक्यात उलटी कुऱ्हाड मारून त्याला रक्तभंबाळ केले. तर इतर दोघांनाही मारहाण करून दुखापत केले. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबत पोलिसांनी दिली माहिती अशी की, निखिल नितीन पवार यांची आजी सुशीलबाई मुरलीधर पवार व चुलत भाऊ हिम्मत कैलास पाटील हे १६ रोजी शेतात काम करीत असताना शेजारील शेतातील विनोद सुरेश पाटील, सुरेश शिवाजी पाटील, मनोहर शिवाजी पाटील , शिवाजी गोबजी पाटील हे आजी सुशिलाबाईशी बांधाच्या जुन्या वादावरून शिवीगाळ व मारहाण करीत होते. तेव्हा निखिल व हिम्मत दोघे आजीला सोडवायला गेले असता विनोद याने हातातील कुऱ्हाडीने उलट्या बाजुने हिम्मत याच्या डोक्यावर व कमरेवर मारून जखमी केले. तर सुरेश मनोहर , शिवाजी यांनी देखील लाकडी दांडक्याने हातावर पायावर मारहाण करून जखमी केले. तर सुरेशने निखिलच्या हातावर लाकडी दांडका मारून जखमी केले. त्यांनतर ते दवाखान्यात आले असता मनोहर याने आजोबा गोरख भुता पवार यांना देखील भांडणाच्या कारणावरून शनिमंदिराच्या ओट्यावरून खाली ढकलून दुखापत केली. याबाबत निखिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button