खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यातील ८०० नागरिकांच्या ई-गृहप्रवेशान झाले घराचे स्वप्न पूर्ण

कळमसरे येथील शांताबाई निकम यांना प्रातिनिधीक स्वरुपात दिली घराची चावी

अमळनेर(प्रतिनिधी) जीवनात प्रत्येकाचे स्वत:च्या घराचे स्वप्न असते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यातील ८०० लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यांचा ई-गृहप्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद सदस्या.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते कळमसरे येथील शांताबाई निकम यांना प्रातिनिधीक स्वरुपात घराची चावी देण्यात आली.
अमळनेर तालुक्यात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राबविलेल्या गेलेल्या या अभियानांतर्गत तालुक्यातील ८०० नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण झाले. महा आवास अभियानाअंतर्गत अमळनेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण४५० घरकुले अभियान कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आले. तसेच राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजना अंतर्गत एकूण ३५० लाभार्थ्यांचे घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले. राज्यस्तरीय कार्यक्रमाचे वेळी प्रातिनिधीक स्वरुपात ५ लाभार्थ्यांना घराच्या किल्ल्या देण्यात आल्या. महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आला. यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी मान्यवर उपस्थित होते. अमळनेर पंचायत समिती कार्यालयात सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, मा.उपसभापती शाम अहिरे, पं.स.सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, कक्ष अधिकारी के.डी.पाटील, समाजसेवक दिपक पाटील, अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्यासह लाभार्थी इंदुबाई पाटील (निम), अशोक पाटील (निम), नंदू राठोड (सारबेटे खु), प्रविण कोळी(जैतपीर) उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button