खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नागरिकांनी पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहून संभाव्य धोके टाळावेत

अमळनेर (प्रतिनिधी)पावसासोबत येणारी अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या बीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या आणि घरगुती विजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे यांनी केले आहे.
अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या विजतारा, विजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी २४ तास सुरु असणार्‍या कॉलसेंटरचा मोबाईल क्रमांक +917798120155 टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. लॅण्डलाईन टोलफ्री क्रमांक उपलब्ध आहे 18002333435 .18001023435 कोणत्याही कंपनी च्या मोबाईल फोन किंवा लँड लाईन द्वारे विज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. वीजग्राहकाने कॉल सेंटरमध्ये रजिस्टर्ड केलेल्या तीनपैकी कोणत्याही वैयक्तिक दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांकावरून तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. तसेच महावितरण च्या मंडळ स्तरावरील नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button