खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

तीन वेगवेगळ्या अपघातात चोपडा तालुक्यातील पाच जखमी

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील जळोद , पैलाड , आणि धुळे  रोड वरील प्रवेशद्वाराजवळ झालेल्या अपघातात चोपडा  तालुक्यातील पाच जण जखमी झाले आहेत विशेष म्हणजे तिन्ही अपघात मोटारसायकली घसरून झाले आहेत.
धुळे रस्त्यावरील नव्याने बनवले जात असंलेले प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी रात्री साडे आठ वाजता  चोपडा तालुक्यातील वराड येथील दोन तरुण  मोटरसायकल क्रमांक एम एच १९, डी एल १८९८ वरून घसरून  प्रवेशद्वाराच्या पिलर ला धडक लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत, प्रवेशद्वाराचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे बांधकाम साहित्य येथे पडून आहे, काम सुरू असूनही,वाहतूक मात्र या प्रवेद्वारच्या एक बाजूने सुरू झाली आहे. मातीचा ढीग , खडी , वाळू पडलेले आहेत. त्याच प्रमाणे पैलाड येथे देखील नागलवाडी तालुका चोपडा येथील देवेंद्र सोपान राजपूत    याची मोटरसायकल घसरून तो व त्याच्यासोबतीतील इसम जखमी झाला आहे तर जळोद येथे काजीपुरा हिंगोणे ता चोपडा येथील ज्ञानेश्वर भुरा भिल याची मोटरसायकल घसरून जखमी झाला आहे सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत पोलीस पंचनामा करीत होते.
धुळे रोड वर प्रवेश द्वाराजवल समोरून वाहन आल्यास पुढील बांधकाम साहित्य दिसत नाही त्यामुळे येथे रोज अपघात घडत आहेत, अशा पध्दतीने अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या प्रवेशद्वार च्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे संजय पुनाजी पाटील यांनी केली आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button