खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शहरासह तालुक्यात कोरोनाने आणखी ६ जणांचा घेतला बळी, ७० रुग्ण पॉझिटिव्ह

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात कोरोनाने आणखी ६ जणांचा बळी घेतला आहे. तर पुन्हा ७० पॉझिटिव्ह आढळले आहेत.
अमळनेर तालुक्यात कोरोनाने चांगलेच पाय पसरवले आहेत. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा आपापल्या परीने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरीही अजून अनेक जण गांभीर्याने घेत नसल्याने संसर्ग रोखण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यात अनेकांचे बळी जात असले तरी अनेक जण अजूनही नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. त्यात काल पुन्हा ६ जणांचा बळी गेला आहे. तर ७० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहून संसर्ग रोखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button