खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जैन धर्मीय दीक्षा बॅनर काढल्याने रास्ता रोको करून आंदोलन

उप मुख्याधिकारी यांच्यावर कारवाईसाठी पोलिस ठाण्यात ठिय्या

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेने जाहिरात कर बुडवणाऱ्या डिजिटल प्रेसवाल्यांचे बॅनर फाडून केलेल्या कारवाईत जैन धर्मीय दीक्षा  बॅनरही काढल्याने तणावाचे वातावरण निर्माण होऊन बॅनर फाडल्याप्रकरणी उप मुख्याधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात यावी, यासाठी पाचपावली देवी मंदिराजवळ रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिस स्टेशनला जमून सर्वांनी ठिय्या मांडला.
नगरपालिकेने कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार उपमुख्याधिकारी गायकवाड, मुकादम अनिल बेंडवाल, मुकादम अनिल बाविस्कर, सुधाकर बिऱ्हाडे, गणेश ब्रमहें आदींनी शहरातील सुभाष चौक, नगरपालिका व इतर भागात पालिकेच्या जागेवर विविध जाहिरातीचे लावलेले डिजिटल बॅनर फाडून कारवाई केली आहे.  गेल्या वर्षभरापासून डिजिटल प्रेस वाल्यानी पालिकेला जाहिरातीच्या कराच्या रुपात एक रुपया ही न देता जाहिरातदारांकडून १० पट पैसे घेऊन शहर विद्रुपीकरण केले आहे. त्यामुळे उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी कारवाई सुरू केली आहे.

भाडोत्री कामगार आणून उप मुख्याधिकारी यांनी बॅनर काढल्याचा आरोप

रात्रीच्या सुमारास भाडोत्री कामगार आणून उप मुख्याधिकारी गायकवाड यांनी बॅनर काढल्याने त्यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी छोटू जैन, पंकज मूंदडा, महाविर(पप्पू) पहाडे, कमल कोचर, भरत कोठारी, योगेश कोठारी, पूनम जैन, प्रसाद शर्मा, बजरंग अग्रवाल, निशांत अग्रवाल, प्रसन्न जैन, अॅड. सुशिल जैन,प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडा,प्रसन्न जैन, आदि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रात्री साडेअकरा पर्यत कोणतीही कारवाई झालेली नव्हती.

स्वच्छेने इतर कामगारांना मदतीसाठी घेतल्याचे गायकवाड यांचे म्हणणे

कारवाईसाठी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले असता त्यांनी टाळाटाळ केल्याने स्वच्छेने इतर कामगारांना मदतीसाठी घेतल्याचे गायकवाड यांनी पत्रकाराना सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button