खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

एचआयव्ही बाधित अनाथ मुलांनासह विधवांना प्रोटिन्सचे केले वाटप

रोटरी क्लब आणि आधार संस्थेच्या वतीने राबविण्यात आला उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) येथील एचआयव्ही सोबत जगणारे अनाथ मुले व विधवा यांना रोटरी क्लब आणि आधार संस्थेच्या वतीने प्रोटिन्सचे वाटप करण्यात आले.
अमळनेर येथील एचआयव्ही सोबत जगणारे अनाथ मुले व मुली यांना प्रोटिन्सचे वाटप करण्याची गरज म्हणून रोटरी अध्यक्षांना आधार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सांगण्यात आले व त्यास सहकार्य करण्यास होकार देत पुढील सहा महिने वाटप करायचे ठरवले. त्यास येणारा खर्च रोटरी क्लब व रोटरी सभासद करणार आहे. दिनांक १८ जानेवारी रोजी पहिला कार्यक्रम करण्यात आला, आधार बहुद्देशीय संस्थेच्या कार्यालयात सकाळी ११.०० वाजता सर्व गरजू अनाथ २५ मुला, मुलींना बोलवून माजी आमदार स्मिताताई वाघ, डाॅ.शरद बावीस्कर, राजेश जैन (प्रोजेक्ट चेअरमन), अभिजीत भांडारकर (अध्यक्ष), महेश पाटील(सेक्रेटरी) यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. या नंतर आधार संस्थेच्या भारती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, अध्यक्ष अभिजीत भांडारकर यांनी या पुढे देखील अशीच समाज उपयोग कामे करत रहाण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमात सहभागी रोटरी सभासदाच्या हस्ते देखील वाटप करण्यात आले पुनम कोचर, दिनेश रेझा, रोहीत सिंघवी, वृषभ पारख, योगेश येवले, प्रतिक जैन, तहा बुकवाला, धिरज अग्रवाल व सर्व रोटरी सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button