दुचाकीसह घरफोडीतील सुमारे ५० हजार रुपयांचा माल पोलिसांनी केला जप्त
अमळनेर (प्रतिनिधी) दुचाकी चोरटा आणि अट्टल घरफोड्या असलेल्या अमळनेर येथील राजेश एकनाथ निकुंभ उर्फ दादू धोबी याला एलसीबी पोलिसांनी रात्री २ वाजेच्या सुमारास गांधलीपुरा परिसरातून अटक करून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीची दुचाकी आणि घरफोडीतील सुमारे ५० हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे
अमळनेर शहरातील पाच कंदील चौकातील दुकान फोडीप्रकरणी आरोपी दादू धोबी असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले होते. मात्र तो पोलिसांना चकवा देत होता. तो सोनगीर ,धुळे , वालखेडा , लोण चारम परिसरात भटकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळली होती. दादू हा रात्री बिना नंबरची दुचाकी फिरवत असल्याची माहिती एलसीबीचे हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील , प्रदीप पाटील , सुरज पाटील , प्रवीण मांडोळे , दीपक शिंदे , परेश महाजन ,इद्रिस पठाण , अशोक पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याला अधिक विचारपूस केली असता चोरुन नेलेला माल त्याने स्वतःच्या राहत्या घरी ठेवला होता तो पोलिसांना काढून दिला पोलिसांनी त्याच्या ताब्यातुन सुमारे ५० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे व आरोपीस अटक करण्यात आली आहे.