खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

कडी कोंडा तोडून चोरटय़ाने घरातील १५ हजार रोख व चार भार चांदी नेली चोरून

अमळनेर (प्रतिनिधी)घरातच झोपलेले असतानाही चोरटय़ाने मागील दरवाजाचा कडी कोंडा तोडून चोरटय़ाने घरातील १५ हजार रुपये रोख व चार भार चांदी चोरून नेल्याची घटना १० रोजी रात्री शहरातील ताडेपुरा भागात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील अरमान खाटीक हे १० रोजी रात्री घरातील बाहेरच्या टप्प्यात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरच्या मागील दरवाजाचे कडी कोंडा तोडून प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाचे कुलूप तोडून घरातील १५ हजार रुपये रोख व चार भार चांदी चोरून नेली. अरमान यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button