खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अमळनेर खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार

जानेवारीच्या अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन एप्रिलमध्ये होणार मतदान

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही प्रसिद्ध असलेल्या अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा एप्रिल मध्ये कालावधी पूर्ण होऊन लवकरच नूतन पदाधिकारी निवडीसाठी निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे पुन्हा ही संस्था चर्चेत आली असून जानेवारी अखेर निवडणुकीची घोषणा होऊन ८ एप्रिल रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. तर या निवडणुकीत सत्ता पलट होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.  
अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या अनेक प्राथमिक, माध्यमिक, स्वतंत्र मुलींच्या प्राथमिक ते माध्यमिक शाळा, महाविद्यालय, डीफार्मसी, संगणक शास्त्र इथपर्यंत मर्यादित विस्ताराचा पण नावलौकिक असलेला गौरवपूर्ण भूतकाळ व वर्तमान आहे. त्यामुळे या शैक्षणिक संस्थेची निवडणूक प्रत्येकवेळी चर्चेची ठरत असते. या संस्थेची त्रैवार्षिक निवडणुक होत असते. गेल्या वेळी एप्रिल २०१८ मध्ये निवडणूक झाली होती. यात आशीर्वाद पॅनलने सातपैकी पाच जागा जिंकत खान्देश शिक्षण मंडळाची सत्ता काबीज केली आहे. जुन्यांना नाकारत सभासदांनी चार नव्या उमेदवारांनाही संधी दिली होती.
तसेच निवडणुकीच्या दोन महिने आधीच नूतन निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करावा लागतो. त्यामुळे जानेवारी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधकांकडून चाचपणीपण सुरू झाली आहे. संस्थेचे राज्यभरात ४ हजार ५०० सभासद आहेत. या प्रत्येक सभासदभापर्यंत पोहोचण्याचे नियोजन इच्छुकांकडून केले जात आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या अंतर्गत हालचालींना वेग आहे. सभासदही या संस्थेच्या मतदार यादीत नाव आहे किंवा नाही, याची खात्री करून घेत आहेत.  तसेच कोण-कोण उभे राहणार आहेत, याचाही कानोसा घेतला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर बोट ठेवण्यासाठी विरोधकही पुरावे गोळा करीत असून सत्ताधारीही तीन वर्षात केलेल्या कार्याचा लेखाजोगा मांडण्याचे नियोजन करीत आहेत. एकंदरीत यंदाही निवडणूक अत्यंच चुरशीची अशी ‘अर्थ’पूर्ण राहणार आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा निवडणुकीकडे लागल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button