खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

????प्रमुख पठारे????

1) सासवडचे पठार – पुणे
2) पचगणीचे पठार – सातारा
3) खानापूरचे पठार – सांगली
4) यवतमाळचे पठार – यवतमाळ
5) भुलढणाचे पठार – बुलढाणा
6) गाविलगडचे पठार – अमरावती
7) औंधचे पठार – सातारा
8) अहमदनगर पठार – अहमदनगर
9) तलेगावचे पठार – वर्धा
10) मालेगाव पठार – नाशिक
11) तोरणमाळ पठार – नंदुरबार

????प्रमुख पठारे????
महाराष्ट्र

???? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा ” लीजन ऑफ मेरिट ” पुरस्कार जाहीर

◾️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने हा पुरस्कार भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला

◾️ लीजन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष्ठीत पुरस्कार समजला जातो . अतुलनीय आणि असामान्य कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो

◾️ हा पुरस्कार इतर देशांच्या प्रमुखांसह अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना प्रदान केला जातो

???? पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत झाले . या आधारेच ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला

◾️ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन व जपानचे पुर्व पंतप्रधान शिंझो आबे यांना सुध्दा ” लीजन ऑफ मेरिट ” जाहिर

✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार

???? ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद
???? देश : सौदी अरेबिया

???? स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान
???? देश : अफगाणिस्तान

???? ग्रँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार
???? देश : पॅलेस्टाईन

???? ऑर्डर ऑफ झायेद
???? देश : संयुक्त अरब अमिरात

???? सियोल शांती पुरस्कार
???? देश : दक्षिण कोरिया

???? यु एन चँपियन्स ऑफ द अर्थ
???? संस्था : संयुक्त राष्ट्र

???? ग्लोबल गोलकीपर पुरस्कार
???? संस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन

???? किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां
???? देश : बहरीन

???? निशान इज्जुद्दीन पुरस्कार
???? देश : मालदीव

???? ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू 
???? देश : रशिया

???? लीजन ऑफ मेरिट
???? देश : अमेरिका .

 

: ????एका ओळीत सारांश, 03 जानेवारी 2021.

★◆❤️★ संरक्षण ★◆❤️★

01 जानेवारी 2021 पासून सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांचे नवीन महासंचालक – व्हाइस अॅडमिरल रजत दत्ता.

◆❤️◆अर्थव्यवस्था◆❤️◆

भारतीय रिझर्व्ह बँकेनी भारतात रोखविरहित व्यवहारांमधली वाढ मोजण्यासाठी एक __ जाहीर केला – डिजिटल पेमेंट्स इंडेक्स.

◆❤️◆आंतरराष्ट्रीय◆❤️◆

भारत सरकारच्या भू-शास्त्र मंत्रालयाने _ या दक्षिण आशियाई देशांकरिता ‘फ्लॅश फ्लड मार्गदर्शन सेवा’ सादर केली आहे – भारत, बांगलादेश, भुटान, नेपाळ आणि श्रीलंका.

◆❤️◆राष्ट्रीय◆❤️◆

या संघटनेनी “ई-खादी इंडिया” नामक एक ई-वाणिज्य संकेतस्थळाचे अनावरण केले आहे, जिथे स्थानिक पातळीवर बनवलेल्या खादी व ग्रामीण उद्योग उत्पादनांची विक्री केली जाणार – खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC).

केंद्रीय मंत्रिमंडळाने बाह्य अंतराळाचा शांततापूर्ण वापरासाठी भारत आणि _ दरम्यान सहकार्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराला मंजूरी दिली – भुटान.

◆❤️◆राज्य विशेष◆❤️◆

आशियाई विकास बँक (ADB) आणि भारत सरकार यांनी ____ राज्यात फलोत्पादनाचा विस्तार करण्यासाठी प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने 10 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली – हिमाचल प्रदेश.

जम्मू व काश्मिरच्या फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी, जम्मू व काश्मिर सरकारने _ सोबत एक सामंजस्य करार केला – भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ मर्यादित (NAFED).

◆❤️◆सामान्य ज्ञान◆❤️◆

“मानव तस्करी व कामावर करण्याची सक्ती याला प्रतिबंध” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 23.

“कारखान्यांमध्ये बालरोजगारावर याला प्रतिबंध” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 24.

“धर्मनिष्ठेचे स्वातंत्र्य आणि धर्माचा सराव व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 25.

“धार्मिक कार्ये करण्याचे स्वातंत्र्य” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 26.

“कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर भरण्यापासून स्वातंत्र्य” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 27.

“काही विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनेत उपस्थितीबाबतचे स्वातंत्र्य” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 28.

: *????‍♂️ I General Knowledge*

1) “न्युमोसील” या ब्रँड खाली स्वदेशी लस कोणत्या संस्थेनी विकसित केली?

*उत्तर* : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

2) न्यू भाऊपूर-न्यू खुर्जा भाग कोणत्या मार्गिकेचा आहे?

*उत्तर* : ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर

3) “पोर्तुलाका लालजी” ही संज्ञा कशासाठी वापरली गेली आहे?

*उत्तर* : सन रोज (उर्फ सूर्य गुलाब)

4) भारताच्‍या पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात झाले?

*उत्तर* : दिल्ली

5) ‘सुत्रनिवेदनाची सूत्रा – एक अणभव’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोणती व्यक्ती आहे?

*उत्तर* : डॉ. रूपा च्यारी

6) विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) कोणत्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आर. पी. तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची एक समिती नेमली आहे?

*उत्तर* : पंजाब

7) थोबल बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या शहरात आहे?

*उत्तर* : अल्पोपहाराचे खरेदी-विक्री केंद्र

8) घन-इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेणारी कोणती कंपनी पहिली भारतीय कंपनी ठरली?

*उत्तर* : स्कायरूट एरोस्पेस

???? Whatsapp वर मिळवा महत्त्वाच्या घडामोडी न्यूज अपडेट करीता खबरीलाल ला जाॅईन व्हा????

: ❇️RRB NTPC EXAM 28 December
2020 को पूछे गये प्रश्न {स्मृति पर आधारित}❇️

ꆰ1) DRDO प्रमुख {अध्यक्ष } कौन है?
उत्तर: सतीश रेड्डी

ꆰ 2) जब बंगाल विभाजित हुआ , तो वायसराय कौन था?
उत्तरः लार्ड कर्जन।

क 3) जो भारत का पहला राष्ट्रीय उद्यान है?
उत्तरः जिम कोर्बेट नेशनल पार्क।

क्यू 4) सूरत किस नदी के किनारे स्थित है?
उत्तरः ताप्ती

क्यू 5) जब पानिपत की दूसरी लड़ाई लड़ी थी?
उत्तरः1556 (अकबर ने हेमू को हराया)

ꆰ6) जहां राष्ट्रमंडल युवा खेल आयोजित किया गया था?
उत्तरःबेल्फ़ास्ट

ꆰ7) पर्यावरण दिवस विषय?
उत्तरःप्रकृति हेतु समय

ꆰ8) जहां गोबी रेगिस्तान है?
उत्तरः मंगोलिया और चीन।

ꆰ9) बड़ौदा बैंक का किस बैंक के साथ विलय कर दिया गया है?
उत्तरः देना बैंक और विजया बैंक मे

ꆰ10) ने हमें 2020 (पुरुषों) को खोला?
उत्तर: डोमिनिक थाइम।

ꆰ11) दूरी की इकाई क्या है?
ꋬꋊꇙ मीटर

ꆰ 12) वर्तमान ꉔꋬꍌ कौन है?
ꋬꋊꇙ शरद अरविंद बोवडे

ꆰ13) पृथ्वी का घनत्व क्या है?
उत्तरः5.51 ग्राम/सेमी ^3।

ꆰ 14) चाँद का घनत्व क्या है?
उत्तर: 3.34 ग्राम/सेमी ^3।

ꆰ 15) काठी पीक या काठी हिल कहाँ स्थित है?
उत्तरःअंडमान और निकोबार द्वीप समूह

ꆰ16) वायरस के कारण बीमारियों?

ꆰ17) पदार्थ की माप?

18) कंप्यूटर का मस्तिष्क क्या है
उत्तरःसीपीयू

ꆰ 19) स्वराज मेरा जन्म सिद्ध अधिकार है किसने कहा है?
उत्तरःबाल गंगाधर तिलक

ꆰ20) जब चंद्रायन 2 शुरू किया गया था?
उत्तरः 22 जुलाई 2019

ꆰ 21) चुनाव आयोग किस लेख के तहत चल रहा है?
उत्तरःसंविधान के अनुच्छेद 324-329 और भाग 15।

ꆰ22) जब आप चाँद की यात्रा करते हैं तो द्रव्यमान पर क्या प्रभाव होगा?
ꋬꋊꇙ: कोई प्रभाव नहीं।द्रव्यमान हर जगह एक ही है.

ꆰ23) अंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस मनाया जाता है?
उत्तरः22 अप्रैल

ꆰ24) राजतरंगिनी के लेखक कौन हैं?
उत्तरः कल्हण

ꆰ25) यदि पृथ्वी पर आपका वजन 60 किग्रा हैचाँद पर आपका वजन क्या होगा?
ꋬꋊꇙ: चंद्रमा पर वजन मूल वजन का 1/6 वां और 10 किलो हो जाएगा।

ꆰ26) मुकुरती राष्ट्रीय उद्यान कहां है?
उत्तर: नीलगिरि, तमिलनाडु

ꆰ27) अंतर्राष्ट्रीय महिला दिवस मनाया जाता है?
उत्तरः8 मार्च

ꆰ28)ओजोन दिवस मनाया जाता है?
उत्तरः 16 सितम्बर

ꆰ29) जब सीपीसीबी की स्थापना हुई थी?
उत्तर: 1974

ꆰ 30) प्रकाश वर्ष एक इकाई है
ꋬꋊꇙ: दूरी

ꆰ31) ज्ञानपीठ पुरूषकार 2019 को सम्मानित किया गया था?
उत्तरःअक्किथम अचुथन नंबूदिरी (मलयालम)

ꆰ 32) रुक्मिणी देवी अरुंडले किस नृत्य के साथ जुड़ा हुआ है?
उत्तर: भारतनाट्यम

ꆰ33) जब अमित घोष को ज्ञानपीठ पुरस्कार दिया गया था?
उत्तरःदिसम्बर 2018

ꆰ35) यूरिया का सूत्र क्या है?
ꋬꋊꇙ: एनएच 2

ꆰ36) वैश्विक भूख सूचकांक में भारत का रैंक क्या है?
उत्तर: 94

ꆰ37) किस राज्य में सबसे लंबे समय तक समुंदर का किनारा है?
उत्तरःगुजरात

ꆰ38) रेशम उत्पादन है?
उत्तरःरेशम की खेती

ꆰ39) हिमाचल प्रदेश का मुख्य मंत्री कौन है?
उत्तरः जय राम ठाकुर

???? एमपीएससी मंत्र : ऐतिहासिक घटनांचे शताब्दी वर्ष : २०२०
#History

✔️ स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या सार्वजनिक निवडणुका, असहकार आंदोलन आणि गांधीजींच्या हाती स्वातंत्र्यलढय़ाची सूत्रे, भारतीय उद्योग जगतात असोचॅमची स्थापना, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे अलिगड मुस्लीम विद्यापीठात रूपांतर अशा आधुनिक भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या घटनांचे शताब्दी वर्ष म्हणून २०२० या वर्षांकडे पाहता येईल.

✳️ पहिल्या सार्वजनिक निवडणुका : १९२० ➖

✅ नगरपालिका, जिल्हा मंडळ अशा स्थानिक मंडळांमध्ये पूर्णपणे लोकप्रिय नियंत्रण असावे, प्रांतीय शासनात अंशत: जबाबदार सरकारची स्थापना करावी, केंद्रीय कायदेमंडळाचा विस्तार करून तेथे भारतीयांना अधिक प्रतिनिधित्व द्यावे, प्रांतातील लोकप्रिय शासनावरील भारत सचिवाचे नियंत्रण कमी करावे या १८१८च्या माँटफर्ड अहवालातील शिफारशींना १९१९च्या भारत सरकार कायद्यात कायदेशीर रूप देण्यात आले आणि त्यानुसार प्रांतात दुहेरी शासन (अर्थात प्रांतिक शासन आणि केंद्रीय शासन) पद्धतीचा प्रारंभ झाला. प्रारंभापासूनच या कायद्याला पुरेसे सहकार्य मिळाले नसले तरीही भारतातील पहिली निवडणूक १९२० साली झाली आणि १९२१ ते १९३७ या कालावधीत नऊ प्रांतांमध्ये दुहेरी शासन चालले. बंगालमध्ये मात्र १९२४ ते १९२७ आणि मध्य प्रांतात १९२४ ते १९२६ या काळात दुहेरी शासन नव्हते.

✳️ असहकार चळवळ ➖

✔️ १९१९ मध्ये संमत करण्यात आलेल्या जुलमी रौलट कायद्यामुळे झालेल्या जालियानवाला बाग हत्याकांड तसेच खिलाफत वादावरील इंग्रजांची भूमिका, पंजाबमधील लष्करी कायदा आणि त्यानंतर पंजाबमधील घटनांची चौकशी करण्यासाठी सरकारने केलेली हंटर आयोगाची नियुक्ती ही केवळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी केलेली क्लृप्ती आहे असे लक्षात आल्यामुळे १ ऑगस्ट १९२० रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली. त्याच दिवशी १ ऑगस्टच्या पहाटे लोकमान्य टिळक कालवश झाल्याने त्यांच्या मृत्यूचा दुखवटा व आंदोलनाची सुरुवात देशभरातील जनतेने हरताळ पाळून केली. सप्टेंबर १९२० मध्ये कोलकत्ता येथे खास अधिवेशन बोलावून राष्ट्रीय काँग्रेसने असहकाराचा कार्यक्रम अंगीकारला. डिसेंबर १९२० मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात सरकारी पदव्यांचा त्याग करणे, कायदे मंडळ, न्यायालये, शिक्षण संस्था, परकीय माल यावर बहिष्कार टाकणे तसेच शिस्त राखणे, राष्ट्रीय शिक्षण संस्थांना संरक्षण, खादीचा वापर अशा मार्गाचा वापर करून असहकार आंदोलनाचा मार्ग निश्चित केला. १९२१ मध्ये असहकार चळवळीत जवळजवळ ३०००० लोक तुरुंगात गेले, परंतु चळवळीदरम्यान उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे लोकांनी एका पोलीस चौकीला आग लावली त्यात अनेक पोलीस जळून मृत्युमुखी पडल्यामुळे अहिंसक मार्गाने चालणाऱ्या चळवळीला गालबोट लागले आणि गांधीजींनी या घटनेचा निषेध म्हणून ही चळवळ मागे घेतली. गांधीजींच्या या निर्णयावर अनेकांनी टीकाही केली परंतु तत्कालीन एकूण परिस्थिती पाहता आम जनतेची चळवळ दडपून टाकणे सरकारला अवघड नव्हते. जाळपोळीचे निमित्त होऊन जर ही चळवळ दडपली गेली असती तर जनतेची चळवळ दडपली जाऊ शकते असा निष्कर्ष निघाला असता तसेच जवळपास दीड वर्ष चाललेल्या चळवळीमुळे जनतेच्या सहनशीलतेचा अंत होत आला होता त्यामुळे गांधीजींनी कठोर आत्मसंयमाशिवाय सत्याग्रहाचा प्रयोग होऊ शकत नाही असे स्पष्ट करून जनतेला रचनात्मक कार्य करण्याचा निर्देश देऊन चळवळ मागे घेतली.

???? अलिगड मुस्लीम विद्यापीठ ➖

✔️ इस्लाममधील सामाजिक दुष्प्रवृत्ती असणाऱ्या पीर प्रथेला विरोध, गुलामांची प्रथा इस्लामविरोधी आहे अशा आपल्या आधुनिक विचारांचा प्रसार ‘तहजीब उल अखालाक’ या पत्रिकेतून करणाऱ्या सर सय्यद अहमद खान यांनी १८७५ साली मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज सुरु केले. तेथे पाश्चात्त्य विज्ञानाबरोबरच मुस्लीम धर्माचेही शिक्षण दिले जात होते. याच कॉलेजचे रूपांतर १९२० साली अलिगड मुस्लीम विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एक टपाल तिकीटही जारी करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी उर्दू, अरबी आणि पर्शियन भाषांवर तसेच इस्लामिक साहित्यावर संशोधन केले जात असल्यामुळे संपूर्ण इस्लामिक जगाबरोबर भारताच्या सांस्कृतिक संबंधांना नवी ऊर्जा मिळत आहे. शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी या विद्यापीठातर्फे सध्या ‘ब्रिज कोर्स’ सुरू करण्यात आला आहे.

????????????????????????????????????????????????

✳️ असोचॅम ➖

✔️ भारतातील सर्व क्षेत्रातल्या चेंबर्सच्या संस्थापक प्रतिनिधींच्या वतीने असोचॅमची (Associated Chambers of Commerce and Industry of India) स्थापना १९२० मध्ये करण्यात आली.

✔️ सध्या ४०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या चेंबर्स आणि व्यापारी संघटना असोचॅममध्ये सहभागी झाल्या असून संपूर्ण देशभरात ४.५ लाखांपेक्षा जास्त सदस्य आहेत.

✔️ भारतीय उद्योगांसाठी असोचॅम ज्ञानाचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आले आहे. नुकताच असोचॅम स्थापना सप्ताह १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२० दरम्यान साजरा करण्यात आला. या वेळी टाटा उद्योग समूहाला ‘असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंच्युरी’ हा पुरस्कार देण्यात आला.

✔️ टाटा समूहाच्यावतीने रतन टाटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नुकतेच असोचॅमच्या प्रमुखपदी विनीत अगरवाल यांची नेमणूक करण्यात आली आहे. निरंजन हिरानंदानी यांनी त्यांच्याकडे असोचॅमची सूत्रे बहाल केली.

✔️ असोचॅमचे मुख्यालय दिल्ली येथे तर अहमदाबाद, बेंगळूरु, रांची, जम्मू, चंडीगड आणि कोलकाता या ठिकाणी प्रादेशिक कार्यालये आहेत.

✔️ १९२० सालात घडलेल्या वरील घटना भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील मैलाचा दगड असल्यामुळे आणि या घटनांनी शताब्दी पूर्ण केल्यामुळे राज्यसेवा पूर्व तसेच मुख्य परीक्षेत अभ्यासक्रमातील या घटकांवर प्रश्न अपेक्षित आहेत.

????????????????????????????????????????????????

✅✅ अपारंपरिक स्रोतातून येत्या पाच वर्षात राज्य सरकारचं १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मितीचं उद्दिष्ट. ✅✅ #Energy

???? अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून राज्य शासनाने येत्या पाच वर्षात १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवलं आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ही माहिती दिली.

???? या १७ हजार ३६० मेगावॅट वीज निर्मिती व्यतिरिक्त दरवर्षी एक लाख सौर कृषीपंप तसंच अन्य माध्यमातून मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे, यामुळे राज्याच्या कृषी तसंच औद्योगिक विकासाला मोठी गती मिळू शकेल.

????MPSC अधिकारी प्रश्नमंजुषा ????

1)प्राणी आणि वनस्पती पेशींनी बनलेले असतात व पेशी हाच सजीवांचा पायाभूत घटक आहे हे कोणी सिद्ध केले ?

1)राॅबर्ट हूक

2)ॲटनी लिव्हेनहूक

3)श्लायडेन व थिओडोर✅✅

4)आर विरशा

 

2)वायू ऊती कोणत्या वनस्पतीमध्ये आढळतात ?

1)वाळवंटातील वनस्पती

2)जलिय वनस्पती ✅✅

3)वेली

4)1 & 2

 

3)ताग , अंबाडी , नारळ यांच्या खोडात , शिरात व बियावरील कवचात कोणत्या मृत ऊती असतात ?

1) मूल ऊती

2) स्थूलकोन ऊती

3) सरलस्थायी ऊती

4) दृढ ऊती✅✅

 

4)वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?

1) सल्फर

2) पलाश

3) मॅग्नेशियम

4) जस्त✅✅

 

5) पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याचा अभावामुळे होतो ?

1) बोराॅन

2) माॅलीब्डेनम

3) कोबाल्ट

4) लोह✅✅

 

6) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही ?

1) फिलीसीनी

2) मुसी✅✅

3) लायकोपोडियम

4) इक्विसेटिनी

 

7) भारतात गहू पिकाची जनुकीय पेढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे ?

1) लुधियाना

2) महाबळेश्वर

3) कर्नाल✅✅

4) गोरखपूर

 

8) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.

अ) काष्ठमय वनस्पतीच्या झाडांच्या सालातील पेशी मृत असतात.

ब)काष्ठमय वनस्पतीच्या झाडांच्या सालातील पेशीमध्ये आंतरपेशीय पोकळ्या नसतात.

1) फक्त अ बरोबर

2) फक्त ब बरोबर

3) अ , ब दोन्ही बरोबर ✅✅

4) अ , ब दोन्ही चूक

 

✅✅ व्यक्ती विशेष : पिअरे कारदँ ✅✅
#VyaktiVishesh

???? फॅशन डिझायनिंग या क्षेत्राला जगात आणि विशेषत: भारतात अतिश्रीमंतांचे फावल्या वेळेतील चोचले असे आजही, काहीसे अन्याय्य भाषेत हिणवले जाते. वस्त्र व पोशाखनिर्मितीची या देशाला मोठी परंपरा आहे, तरीही. पोशाखनिर्मितीचा सौंदर्यशास्त्रीय भान असलेला, परंतु बाजारपेठेलाच केंद्रीभूत मानणारा आविष्कार म्हणून फॅशन डिझायनिंग म्हणता येईल. परंतु फॅशन डिझायनिंगशी निगडित मंडळी आणि सर्वसामान्यांचे विश्व हे नेहमीच एकमेकांशी अंतर ठेवून वाटचाल करताहेत असे जाणवते.

???? हल्लीची परिस्थिती बदलत आहे, तरी अमक्या फॅशन डिझायनरची तमुक निर्मिती (प्रत किंवा कॉपी असली तरी) आपल्याला विवाहसोहळ्यात परिधान करायचीच, यापलीकडे आमचे फॅशनभान जात नाही. तरीही पिअरे कारदँ आम्हा बहुतेकांच्या परिचयाचे असतात. ९८ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभले; नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधीच, म्हणजे २९ डिसेंबर रोजी त्यांचा जीवनप्रवास थांबला.

???? इटली ही जन्मभूमी आणि फ्रान्स व विशेषत: पॅरिस ही त्यांची कर्मभूमी. १९२४ मध्ये इटलीतील वाढत्या फॅसिस्टवादाला कंटाळून कारदँ यांचे आईवडील फ्रान्सला आले. त्या वेळी पिअरे दोन वर्षांचे होते. त्यांचे वडील अलेस्सांद्रो कारदँ मूळचे सधन जमीनदार. फ्रान्समध्ये त्यांनी वाइनचा व्यापार सुरू केला. पिअरेने वास्तुविशारद व्हावे, असे त्यांना वाटे. परंतु लहानपणापासूनच पिअरे यांचा ओढा पोशाखनिर्मिती आणि संकल्पनाकडे होता.

???? १४व्या वर्षीच ते एका वस्त्रकाराकडे साहाय्यक म्हणून काम करू लागले. तेथे पोशाखांचे संकल्पन, आरेखन आणि बांधणी ही मूलभूत तंत्रे त्यांनी घोटवून घेतली. १९४५ मध्ये ते पॅरिसला आले. तेथे वास्तुशास्त्राचा अभ्यास करण्याची त्यांच्या वडिलांची इच्छा त्यांनी पूर्ण केली खरी, परंतु फॅशन डिझायनिंगमध्येच कारकीर्द करण्याचे त्यांनी ठरवले होते.

???? दुसऱ्या महायुद्धानंतर ज्याँ पाक्वां, एल्सा श्यापारेली, ख्रिस्तियन दिओ अशा मोठय़ा फॅशनकारांकडे त्यांनी उमेदवारी केली. त्यांच्या भविष्यकालीन घडणीसाठी ती मोलाची ठरली.

???? ‘ओट कुटुअर’ प्रकारातील अत्यंत महागडे कपडे बनवण्यात खरे तर त्या वेळच्या कित्येक फ्रेंच आणि इटालियन डिझायनरांची हयात गेली. पिअरे कारदँ यांनी या परंपरेपासून हट्टाने फारकत घेतली. चटकन व्यवस्थित अंगावर घालता येतील, असे कपडे घडवण्यास त्यांनी सुरुवात केली. अर्थातच फॅशनविश्वातील अभिजनांनी त्यांना त्या वेळी वाळीतच टाकले. परंतु पिअरे बधले नाहीत. पोशाखांच्या विविध प्रकारांमध्ये त्यांची मुशाफिरी अविरत सुरू राहिली.

???? महिलांसाठी पोशाख बनवण्याची त्यांची खासियत. १९५०च्या दशकात त्यांनी बनवलेला ‘बबल ड्रेस’ विलक्षण गाजला होता. वास्तुशास्त्राच्या अभ्यासामुळे त्यांचे मितिभान उत्तम होते. रूपबंधाची जाण काळाच्या पुढे पाहणारी होती. पोशाख संकल्पनात त्यांनी भूमितीचा वापर खुबीने केला. मुख्य म्हणजे, अभिजनांचा परीघ भेदून त्यांची निर्मिती बहुजनांमध्येही चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरू लागली होती. इतर समकालीन फॅशन डिझायनरांप्रमाणे ते कोषबद्ध राहिले नाहीत. सर्जकता असीम असते हे तत्त्व त्यांनी पाळले. ‘पिअरे कारदँ’ हे नाव काहीशा दर्पयुक्त अभिमानाने त्यांनी वागवले, कारण चाकोरीबाहेरचा विचार करणे किंवा त्यांचे समलिंगी असणे या बाबींचा त्यांची टिंगलटवाळी करण्यासाठीही वापर केला जायचा. आज पिअरे कारदँ हे नाव निव्वळ फॅशनेबल कपडेच नव्हे, तर सौंदर्यप्रसाधनांपासून महागडय़ा पेनांपर्यंत विविध बाबींवर झळकते. पिअरे यांची महत्त्वाकांक्षा आणि सर्जनशीलता यांच्या व्याप्तीचा तो पुरावा आहे.

✅✅ चीनचे बॉटल वॉटर किंग के झोंग शानशान बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; मुकेश अंबानी यांना टाकले मागे. ✅✅
#Asia

???? चीनचे के झोंग शानशान यांनी पत्रकारिता, मशरुमची शेती आणि हेल्थ केअर या क्षेत्रात त्यांचं चीनमध्ये मोठ नाव आहे. हेच शानशान आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

???? तर भारताचे मुकेश अंबानी आणि चीनचे जैक मा आणि इतर श्रीमंतांना मागे टाकत त्यांनी हे स्थान पटकावलं आहे.

???? ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, शानशान यांची एकूण संपत्ती 70.9 अब्ज डॉलरपासून 77.8 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे.

???? तसेच शानशान जगातील 11 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●

✅✅ दिनविशेष ✅✅
#DinVishesh

???????? ३ जानेवारी – घटना ????????

१४९६: लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.

१९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.

१९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.

१९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.

१९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.

१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.

२००४: नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.

???????? ३ जानेवारी – जन्म ????????

१८३१ : पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च१८९७)

१८८३: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचा जन्म. (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)

१९२१: हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै१९९७)

१९२२: सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.

१९३१: मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

???????? ३ जानेवारी – मृत्यू ????????

१९०३: अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील अ‍ॅलॉइस हिटलर यांचे निधन. (जन्म: ७ जून १८३७)

१९७५: भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी ललित नारायण मिश्रा यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)

१९९४: मराठी बालकुमार लेखक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन.

१९९८: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचे निधन (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)

२०००: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)

२००२: भारीतय अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)

२००५: भारतीय नेते जे. एन. दिक्षित यांचे निधन.

???????? सावित्रीबाई जोतीराव फुले ????????

 (३ जानेवारी, इ.स. १८३१ – १० मार्च, इ.स. १८९७)

ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.

 महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.
त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाले

सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना “फुले” हे आडनाव मिळालेत

सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.[२]

(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये मुले आणि मुलींसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)

सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्य

ा निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.

सत्कार ……????

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.

????????सांगोला ते शालीमार दरम्यान धावली 100 वी किसान रेलगाडी????????

????28 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातले सांगोला (जिल्हा सोलापूर) ते पश्चिम बंगालमधले शालीमार या दोन स्थानकांच्या दरम्यान 100 व्या किसान रेलगाडीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

????पाठविण्यात येणाऱ्या अनेक प्रकाराच्या मालाच्या एकत्रित रेलगाडी वाहतूक सेवेमध्ये फुलगोबी, ढोबळी मिरची, कोबी, शेवग्याच्या शेंगा, मिरची, कांदा अशा भाज्या तसेच द्राक्षे, संत्री, डाळिंब, केळी, सीताफळ इत्यादी फळे असणार आहेत. मार्गातल्या सर्व थांब्यांवर मालवाहतुकीच्या या रेलगाडीच्या आकाराला कोणतेही बंधन न ठेवता नाशिवंत माल रेलगाडीमध्ये भरणे आणि उतरवण्याला परवानगी देण्यात आली आहे.

????ठळक बाबी

????केंद्र सरकारने फळ आणि भाज्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के सवलत दिली आहे.
पीएम कृषी संपदा योजनेच्या अंतर्गत मेगा फूड पार्क, शीत साखळी पायाभूत आणि कृषी प्रक्रिया क्लस्टर अंतर्गत अशा 6500 प्रकल्पांना परवानगी देण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेज अंतर्गत सूक्ष्म अन्न-प्रक्रिया उद्योगासाठी 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

????‘किसान रेलगाडी’ विषयी

????किसान रेलगाडी म्हणजे देशातल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. गेल्या 4 महिन्यात 100 किसान रेलगाडी धावल्या.

????पहिली किसान रेलगाडी 7 ऑगस्ट 2020 रोजी देवळाली ते दानापूर पर्यंत चालवण्यात आली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत हा प्रवास वाढविण्यात आला. शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने ही रेलगाडी सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरु करण्यात आली.

????देशभरात कृषी उत्पादनांची जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी किसान रेलगाडीची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे. ही सेवा नाशिवंत उत्पादनांची अखंड पुरवठा साखळी प्रदान करते.
किसान रेलगाडीतून वाहतूक करण्यासाठी किमान प्रमाण निश्चित करण्यात आलेले नाही त्यामुळे छोटे उत्पादनही कमी किमतीत मोठ्या बाजारात पोहोचू शकतात. शेतकरी आपला कृषी माल आता दुसऱ्या राज्यातही विकू शकतो.

????किसान रेलगाडी म्हणजे फळे, भाजीपाला, दुध, मासे यासारखा नाशिवंत माल पूर्ण सुरक्षितपणे वाहून नेणारे फिरते शीतगृह आहे. रेल्वे स्थानक परिसरात नाशवंत रेलगाडी कार्गो केंद्र उभारण्यात येत आहेत, ज्यामध्ये शेतकरी आपल्या कृषी मालाची साठवण करू शकतात.

✅✅ शनिवारच्या कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनसाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड. ✅✅
#Health #Covid19

???? कोरोना लसीकरणाचा ड्राय रन उद्या देशभर होणार असून त्यासाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

???? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल याबाबत घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन केल्याचं त्यांनी सांगितलं.

???? ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातली तीन आरोग्य केंद्रं निवडली आहेत. तीनही  ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडलं जाईल. मात्र प्रत्यक्षात लस टोचली जाणार नाही. पण त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button