खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

क्षुल्लक कारणावरून एकाचे डोके फोडून केले रक्तबंबाळ, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ढेकू खुर्द येथे २१ रोजी रात्री ९ वाजता कारण नसताना शिवीगाळ का करतो असे विचारल्याचा राग आल्याने एकाने डोक्यात दगड मारून डोके फोडल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमृत शिवाजी मैराळे हे हिरालाल पुंडलिक मैराळे यांच्या घराजवळून जात असताना काहीही कारण नसताना त्याने दारूच्या नशेत शिविगाळ करणे सुरू केले. शिवीगाळ का करतो असे अमृत ने विचारले असता हिरालाल ने अंगणातील दगड उचलून अमृतच्या डोक्यात मारून रक्तबंबाळ केले अमृतच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला हिरालाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button