खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नगरपरिषदेचा कारभार बघा गजब, वादग्रस्त कनिष्ठ लिपिक झाला साहेब

मुख्याधिकाऱ्यांनी सोयीसाठी चुकीची पदस्थापना केल्याचे झाले उघड

नगरपरिषदेचे भरकटलेले “प्रशासन” आणि पदाधिकारी मिरवताय “भूषण”

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांना डावलून वादग्रस्त कनिष्ठ लिपिकाला थेट प्रशासन अधिकारी प्रमुख म्हणून बसवण्याचा अजबगजब प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या कामकाजाच्या सोयीसाठी या पदस्थापना केल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी आदेशात म्हटेल आहे. मात्र ही पदस्थापना प्रशासनाची नव्हे तर काहींच्या सोयीसाठीच केल्याचे उघडउघड दिसत असल्याने नगरपालिकाची प्रतिमा मलिन होत आहे. यामुळे भरकटलेले प्रशासन आणि पदाधिकारी मिरवताय भूषण अशी गत नगरपालिकेची झाल्याने त्याचा शहर विकासावर आणि मुलभूत सुविधांवरही परिणाम होत आहे.
मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांनी ११ जून २०२० रोजी नगरपालिकेतील अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात कनिष्ठ लिपिक संजय चौधरी यांची वसुली विभागात वसुली प्रमुख म्हणून नेमणूक होती. मात्र त्यांची थेट प्रशासन अधिकारी प्रमुख म्हणून वर्णी लावली आहे. प्रशासन विभागातील सर्व प्रशासकीय आणि प्रशासकीय कार्यालयीन कामकाज हे त्यांच्या हवाली केले आहे. तसेच वसुली नं.२ विभागात न.प. मालकीचे जागा, गाळे, किरकोळ कर वसुली, आठवडे बाजार वसुली आदी सर्व कामे करण्याकरीता मिळकत व्यवस्थापक म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तसेच प्रशासन विभागातील सभा लिपिक महेश जोशी यांनाही वसुली नं. २ व न.प. मालकीचे जागी, गाळे, किरकोळ कर वसुली, आठवडे बाजार वसुली आदी कामे करून मिळकत व्यवस्थापक म्हणजे संजय चौधरी यांच्या मार्फत मुख्याधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा,असे आदेश दिले आहेत. तर प्रशासन विभागातील काम सांभाळून हा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तसेच उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांची प्रशासन विभागातून वसुली विभागात कर निर्धारण व संकल अधिकारी म्हणून बदली करून न.प हद्दतील निवासी मालमत्ता व कर विषयक संपूर्ण कामकाज सोपवले आहे. म्हणजे उपमुख्याधिकारी गायकवाड यांना अलगद बाजूला काढले.

हापापाचा माल गपागपा करायला वसुली विभागाचे रान केले मोकळे

उपमुख्याधिकारी गायकवाड यांच्याकडे वसुली विभागाची जबाबदारी दिली असतानाही नियमानुसार महेश जोशी यांनी त्यांच्या मार्फत मुख्याधिकाऱ्यांना अहवाल सादर करणे आवश्यक आहे. मात्र त्यांना संजय चौधरी यांच्या मार्फत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. म्हणजे वसुलीत काहीही गोलमाल केले तरी त्याची भनक उपमुख्याधिकारी गायकवाड यांना लागणार नाही, मग हापाहपचा माल गपागपा करायला वसुली विभागाचे रान या सर्वांना मोकळे आहेत. म्हणूनच नियमबाह्य आणि बेकायदेशीर कामे करायला उपमुख्याधिकारी गायकवाड यांचा विरोध असल्याने त्यांना यातून अलगद असे बेकायदेशीरपणे खड्यासारखे बाहेर काढले आहे. मात्र त्यांनी शासनादेश समोर करीत आणि या पदस्थापना कशा बेकायदेशीरपणे केल्या आहेत, याचे अंजन मुख्याधिकाऱ्याच्या डोळ्यात घातले आहे.

उपसंचालकांनी निर्गमित केलेल्या आकृतिबंधाचा केला अवमान

कनिष्ठ लिपिक संजय सुदाम चौधरी यांना प्रशासन अधिकारी तथा मिळकत व्यवस्थापक तसेच औषध निर्मात महेश जोशी यांना व्यवस्थापकामार्फत परस्पर मुख्याधिकारी यांना अहवाल सादर करावा अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. जे की, नियमांना अनुसरून नसून उपमख्याधिकाऱ्यांसह इतर संवर्ग कर्मचाऱ्यांना डावलण्यात आले आहे. हे नैराश्य निर्माण करणारे आणि उपसंचालकांनी निर्गमित केलेल्या आकृतिबंधाचा अवमान करणारे आहे. ही मानसिक स्थिती खराब करत आहे. तसेच संघटनेने सुद्धा या नेमनुकीवर आक्षेप घेतला आहे. आशा आदेशावरून जनतेत सुद्धा चुकीचे आर्थिक हित संबंध जोपासण्यासाठी मुखाधिकाऱ्यांवर मानसिक दबाव आणून असे आदेश काढून घेतले आहे की काय, अशी चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button