खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर येथील २२ नगरसेवक अपात्रतेबाबतची सुनावणी पुढे ढकलली

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या इतरत्र दौऱ्यामुळे सुनावणी झाली रद्द

अमळनेर (प्रतिनिधी) नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या इतरत्र दौऱ्यामुळे अमळनेर येथील २२ नगरसेवकांची अपात्रतेबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारीख अद्याप कळवण्यात आलेली नाही. यामुळे अवघे एक वर्ष मुदत राहिल्याने नगरसेवक कार्यकाळ पूर्ण करतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या गटातील नगरपालिकेतील विरोधी नगरसेवक प्रवीण पाठक , सलीम टोपी व सविता संदानशीव यांनी तक्रार केल्यानन्तर शिरीष चौधरी हे सत्ताधारी भाजप चे सहयोगी आमदार असल्याने शासनावर त्यांचा प्रभाव होताच त्यामुळे नगराध्यक्षांसह २२ नगरसेवक अपात्र करण्यात आले होते. मात्र त्याच वेळी माजी आमदार साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी भाजप आमदार स्मिता वाघ व जिल्हाध्यक्ष स्व उदय वाघ  यांचे सहकार्य घेऊन  नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशाने स्थगिती मिळवली होती. त्यावर विरोधी गट उच्च न्यायालयात गेला होता. न्यायालयाने ६ आठवड्याची मुदत देऊन जिल्हाधिकारीना निर्णय घेण्यास निर्देशित केले त्यात नागर्ध्यक्षांबाबत अधिकार नसल्याने त्यांना वगळण्यात आले होते पुन्हा २२ नगरसेवक अपात्र करण्यात आले होते त्यानंतर सत्ता बदलली नगरसेवकही महाविकास आघाडीचे समर्थक झाले आणि पुन्हा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली १० महिन्यांनंतर पुन्हा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी २७ रोजी सुनावणी बोलावली होती.

    २७ रोजी जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या दालनात सुनावणीसाठी नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी विद्या गायकवाड , सत्ताधारी २२ नगरसेवकांतर्फे अॅड. किरण पाटील उपस्थित झाले. यावेळी सत्ताधारीनंतर्फे व्हिडीओ कॉन्फरन्स ऐवजी प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावण्यात यावे, अशी लेखी मागणी करण्यात आल्याचे समजते. मात्र विरोधी गट गैरहजर होता. थोड्यावेळात मंत्रालयातून मेल आला आणि सुनावणी पुढे ढकलण्याचे कळवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button