खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

दिलासादायक : अमळनेर तालुक्यात दोनच रुग्ण पॉझिटिव्ह, तर एकाचा झाला मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी)शहरासह ग्रामीण भागातील गुरुवारी आलेल्या अहवालात २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत ९८ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४२६२ वर पोहोचली आहे.
अमळनेर शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता घसरू लागली आहे. गुरुवारी अहवालातही 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. हे दोन्ही रुग्ण नवीन असून ग्रामीण भागातील  आहे. तर शहरातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या  एकाही रुग्णांचा समावेश नाही तर गुरुवारी ४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४०४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या सध्या कोविड रुग्णालयात ११७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रुग्ण संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button