खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर शहरासह ग्रामीण भागात पुन्हा ५८ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी)शहरासह ग्रामीण भागात शनिवारी आलेल्या अहवालात पुन्हा ५८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ३३४२ झाली आहे. तसेच ५९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी गेले.
अमळनेर तालुक्यात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे. शनिवारी आलेल्या अहवालातही ५८ रुग्ण पॉझिटिव्ह आले.  त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  या अहवालात नविन ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यात अमळनेर शहर २६, ग्रामीण ११ रुग्णांचा समावेश आहे. संपर्कात आलेल्या २१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर ७२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत २५५१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७१ रुग्णांचा बळी गेला आहे. तसेच वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. म्हणून नागरिकांनी घरातच राहून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button