खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

आजोबाला दोन लाखांत गंडवून मुलीलाही पळवून नेले, गृहरक्षकच निघाले भक्षक !

अमळगांव येथील घटना, दोघांना अटक, पोलिस मुख्य संशयिताच्या मागावर

अमळनेर (प्रतिनिधी) आजी-आजोबांकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे डोरे टाकत तिच्या आजोबाच्या खात्यातून वेळोवेळी दोन लाख रुपये काढून त्या मुलीलाही घेऊन गृहरक्षक (होमगार्ड) दलाचा तरुण रफूचक्कर झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील अमळगाव येते घडली. यात त्याला त्याच दोन होमगार्ड मित्रांनीच मदत केल्याने गृहरक्षकच भक्षक निघाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य संशयित तरुणाचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील एक १६ वर्षाची मुलगी आपल्या आजी-आजोबांकडे  राहत होती. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ही मुलगी अचानक गायब झाल्याचे आजीच्या लक्षात आल्याने त्यामुळे त्यांनी तिचा गावात शोध घेतला. याच वेळी गावातील भाऊसाहेब श्रीराम बाविस्कर तरुण देखील बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आजीने बाविस्कर यानेच नातीला पळवल्याचा संशय व्यक्त करून मारवड पोलिसांत अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एपीआय राहुल फुला यांनी  या प्रकरणाच्या खोलात शिरात तपास केला असता भलतेच प्रकरण समोर आले. त्यामुळे त्यांनी मुलीला पळवून नेलेल्या तरुणाच्या संपर्कातील मित्रांसोबत झालेल्या संवादाची माहिती मागवली. त्यात त्यांना आढळून आले की भाऊसाहेब बाविस्कर याने मुलीशी गोड बोलून तिच्या आजोबांच्या बँकेचे एटीएम कार्ड मागवून पासवर्ड व ओटीपी वेळोवेळीमागवून ऑनलाइन २ लाख रुपये काढून घेतले. हे सर्व पैसे त्याने त्याच्या स्वतःच्या होमगार्डचा पगार होत असलेल्या खात्यावर जमा करून घेतले होते. यासाठी त्याला अमळगाव मधीलच त्याचायसोबत मुंबई येथे होमगार्ड असलेले  दिनेश प्रताप पारधी व प्रवीण चुडामण कुंभार यांनी सहकार्य केले. त्यामुळे एपीआय फुला व एएसआय संतोष पवार, किशोर पाटील, पोलिस नाईक सुनील आगवणे, सुनील तेली, बबलू होळकर, अनिल राठोड , विशाल चव्हाण यांनी सापळा रचून दिनेश पारधी व प्रवीण कुंभार यांच्या शनिवारी ४ रोजी सायंकाळी मुसक्या आवळल्या.  दरम्यान सहा. पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी मुंबई होमगार्ड अधिकाऱ्यांना भाऊसाहेब बाविस्कर संपर्कात आल्यास अथवा आढळून आल्यास मारवड पोलिसांना काळवण्याचे आवाहन केले आहे. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे राहुल फुला यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button