खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शोभाताई , मी स्मिताताई बोलतेय.., मी ही अॅडमिट आहे, तुमच्या शेजारी !

माजी आमदार स्मिताताई वाघांच्या फोनने कोरोनाबाधित महिलेला मिळाला आधार

अमळनेर (प्रतिनिधी) शोभाताई , मी स्मिताताई बोलतेय.. तुम्हाला जास्त त्रास होतोय का.. काळजी नका करू.. बऱ्या व्हाल तुम्ही… मीही अॅडमिट आहे, तुमच्या शेजारच्या वॉर्डात.. असे शब्द फोन वरून ऐकताच रुग्णांना हुरूप येत आहे. आपणच नव्हे तर आपल्या नेत्याही कोरोनाने बाधित असूनही आपली काळजी घेत असल्याने कोरोनाशी लढण्याचे अधिक बळ मिळत आहे.
माजी आमदार स्मिताताई वाघ यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्या जळगाव येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्वतःच कोरोनाशी लढत असताना आपल्या जीवाभावाच्या सर्वसामान्य नागरिकांची परवड होऊ नये म्हणून त्यांनी रुग्णालयातूनही कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस करीत मदतीसाठी आपण असल्याचा विश्वास देत आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णांचाही आत्मविश्वास वाढण्यास आहे. स्मिताताई उपचार घेत असलेल्या रुग्णालयातच अमळनेर येथील कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी फोन केला. त्या महिलेने फोन उचलत कोण बोलत असल्याची विचारणा करताच माजी आमदार स्मिताताई बोलत असल्याचे ऐकून त्यांना चांगलाच धिर आला. तर आपणही त्याच रुग्णालयात असल्याचे सांगितल्यावर त्यांनाही स्मिताताईंची काळजी वाटली. या दोघींचा संवादाने अनेकांचे मन हेलावून गेले.

काय म्हणाल्या स्मिताताई …. ?

शोभाताई , मी स्मिताताई बोलतेय.. तुम्हाला जास्त त्रास होतोय का..? काळजी नका करू.. बऱ्या व्हाल तुम्ही.. मीही अॅडमिट आहे तुमच्या शेजारी… काळजी घ्या तब्येतीची.. मी डॉक्टरांशी बोलले आहे, तुमच्याकडे लक्ष द्यायला सांगितले आहे.  मलाही झाला आहे… तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय का, मीही बाजूच्या वॉर्डात आहे… काळजी घ्या..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button