खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

जगातील टॉप ५०० महासंगणकांची यादी नोव्हेंबर २०१९ मध्ये जाहीर करण्यात आली.

ही एकुणात यादीची ५४ वी आवृत्ती आहे.

जगातील पहिले ४ महासंगणक

१) समिट – अमेरिका
२) सिएरा – अमेरिका
३) सनवे तैहुलाइट – चीन
४) तियानहे २ए -चीन

भारतीय महासंगणकांचे या यादीतील स्थान : प्रत्युष ( ५३ व्या स्थानी ), मिहीर ( ८६ व्या स्थानी )⭕️ रेमडेसेविर औषध पुढील आठवडय़ात उपलब्ध.

???? विषाणूरोधक रेमडेसीवीर हे औषध करोना विषाणूवर उपयुक्त असल्याने त्याच्या वापरास अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने मंजुरी दिली असून हे औषध पुढील आठवडय़ात रुग्णांसाठी उपलब्ध केले जाईल असे सांगण्यात आले.

???? या औषधाची निर्मिती करणाऱ्या गिलीड सायन्सेस या औषध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन ओडी यांनी म्हटले आहे, पुढील आठवडय़ात औषध रुग्णांना उपलब्ध करून दिले जाईल. अमेरिकेतील कुठली शहरे जोखमीची आहेत हे सरकार ठरवेल व नंतर गरजेनुसार हे औषध उपलब्ध केले जाईल.

????अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून ११ लाख लोकांना संसर्ग झाला आहे तर ६७ हजार लोकांचा बळी गेला आहे. भारतीय अमेरिकी डॉ. अरुणा सुब्रमण्यम व इतर काहींनी रेमडेसीवीर हे औषध काही रुग्णांमध्ये उपयुक्त ठरल्याचे संशोधनाअंती म्हटले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या औषधाला मान्यता दिली असून आता ते अमेरिकेत वितरित करण्यात येणार आहे. हे औषध शिरेतून दिले जाते. गंभीर अवस्थेतील करोना रुग्णांत त्याचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे.

‘वंदे भारत मिशन’: परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी
भारताची मोहीम.

???? कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या सर्वात मोठ्या मोहिमेला 7 मे 2020 पासून सुरुवात झाली. ‘वंदे भारत मिशन’ असे या अभियानाचे नाव आहे.

???? या अभियानाच्या पार्श्वभूमीवर तिरुवनंतरपुरम, दिल्ली आणि मुंबईसह अनेक विमानतळांवर आरोग्यासंबंधी सर्व व्यवस्था केली गेली आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोविड-19 रोगाची कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत, त्यांनाच भारतात परत आणले जाणार आहे.

???? इतर ठळक बाबी ????

???? एअर इंडिया या सरकारी हवाई सेवा कंपनीची विमाने आणि जहाजातून जवळपास 15 हजार भारतीयांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणले जाणार आहे. लोकांच्या वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी विमानतळे आणि बंदरे पूर्णत: सज्ज करण्यात आली आहेत.

???? एकूण 64 विमानांपैकी 10 विमाने संयुक्त अरब अमिरातीकडे (UAE), 2 कतारकडे, 5 सौदी अरबकडे, 7 ब्रिटनकडे, 5 सिंगापूरकडे, 7 अमेरिकेकडे, 5 फिलिपीन्सकडे, 7 बांग्लादेशकडे, 2 बहारीनकडे, 7 मलेशियाकडे, 5 कुवैतकडे आणि 4 विमाने ओमानकडे उड्डाण करणार आहेत.

???? एअर इंडिया 12 देशांमधून सुमारे 15000 भारतीयांना टप्प्याटप्प्याने परत आणणार आहे. पहिल्या टप्प्यात 13 मे पर्यंत 64 उड्डाण आयोजित केली जाणार. 13 मे 2020 नंतर खासगी विमान कंपन्याही भारतीयांना परत आणण्याच्या मोहीमेत सामील होऊ शकतात.

???? भारतीय नौदलाची INS जलश्व आणि INS मगर ही जहाजे मालदीवहून भारतीयांना परत आणणार तर INS शार्दुल हे जहाज दुबईकडे वळविण्यात आले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button