खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कृषिभूषण पाटलांसह मुख्याधिकारी आणि सफाई कामगारांचे फुले टाकून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत

प्रभाग क्र ९ मधील न्यू प्लॉट भागातील नागरिकांनी कोरोनाशी लढणार्‍या संपूर्ण योद्धाचे वाढवले बळ

अमळनेर(प्रतिनिधी)आपला जीव धोक्यात घालून माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाशी लढणार्‍या नगरपालिकेच्या संपूर्ण योद्धाचे
प्रभाग क्र ९ मधील न्यू प्लॉट भागात कामगार दिनानिमित्त फुलांचा वर्षाव केला. तसेच सर्व सफाई कामगारांना पोहे व शिऱ्याचा नास्ता आणि डॉ. शरद बाविस्कर यांच्या वतीने मास्क व पालिकेच्या वतीने सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यामुळे त्यांना अधिक काम करण्याचे बळ मिळाले आहे.
श्री राजेशहाजी मित्र मंडळ, शनी मंदिर गल्ली यांच्या वतीने आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सहयोगाने सोशल डिस्टनसिंग ठेऊन हा फुलांचा वर्षाव  केला. तर पालिकेचे नेतृत्व करीत असताना कोरोना सदृश्य परिस्थितीत शहराचे पालकत्व स्वीकारल्यागत उत्तम कार्य करणारे आणि उपयोजनेच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घेणारे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा आणि काही दिवसांपूर्वीच अमळनेर पालिकेत मुख्याधिकारी पदाची धुरा सांभाळली असताना आपल्या चिमुकल्यास मूळगावी ठेऊन कर्तव्य बजावणाऱ्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांचाही विशेष सत्कार  करण्यात आला. याव्यतिरिक्त प्रभागाचे नगरसेवक निशांत अग्रवाल,  उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी,आरोग्य निरीक्षक वाय एस चव्हाण,संतोष बिऱ्हाडे,अरविंद कदम, कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी सोमचंद संदानशिव,प्रभागाचे मुकादम ज्ञानेश्वर संदानशिव, शाम महाजन,अतिक्रमण विभागाचे राधेश्याम अग्रवाल आदी सर्वांचा देखील सत्कार  करण्यात आले.

दोडे गुजर भुवन येथे सर्व कामगारांना सोशल डिस्टनसिंगनुसार चौकोन आखून बसवले

कृषिभूषण पाटलांसह मुख्याधिकारी व कर्मचारी व कामगारांचे सोशल डिस्टनसिंग ने प्रभागात आगमन होताच सर्व रहिवाश्यांनी आपल्या घराच्या दरवाजातून या सर्वाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तर दोडे गुजर भुवन येथे कार्यक्रम स्थळी पोहोचताच सर्वांवर फुलांचा प्रचंड वर्षाव करण्यात आला. यावेळी सर्व कामगारांना सोशल डिस्टनसिंगनुसार चौकोन आखून बसविण्यात आल्याने कृषिभूषण पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक करून कामगारांना व प्रभाग वासीयांना मार्गदर्शन केले.

आरोग्य सेवेतील डॉक्टर्स व कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे प्रभागाने मानले आभार

प्रास्तविकात राजेशहाजी मंडळाचे अध्यक्ष तथा अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी कृषिभूषण पाटील हे शहराचे पालकत्व स्वीकारल्यागत काम करीत असून त्यांच्यासह मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पालिकेची संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत घेत असल्यानेच अमळनेरकर सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे या टीम सह आरोग्य सेवेतील डॉक्टर्स व कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे प्रभागाच्या वतीने आभार मानले. तर प्रभागातील जेष्ठ नागरिक ओस्तवाल जैन समाजाचे अध्यक्ष प्रकाशचंद पारख यांनीही मनोगतातून संपूर्ण टीमचे कौतुक केले. यावेळी, काँगेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, भारतीय जैन संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद जैन,दैनिक जनवास्तव चे कार्यकारी संपादक किरण पाटील,सरकारी वकील अँड राजेंद्र चौधरी,दीपेन राजपूत,डॉ. नरेंद्र जाधव,कोठारी,राजेश भंडारी,जितेंद्र झाबक,राजेश खिलोसीया,प्रा चेतन शर्मा,मनोहर भावसार, जयदीप राजपूत,हेमंत ठक्कर,महेश देशमुख यासह प्रभागाचे जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी दोडे गुजर भुवनचे सेक्रेटरी सी. एस. पाटील यांनी मोफत हॉल उपलब्ध करून दिल्याने त्यांचेही आभार मानण्यात आले. सूत्रसंचालन चेतन राजपूत यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रम यशस्वीतेसाठी,नवीन अग्रवाल,चेतन जाधव बाळा राजपूत,प्रशांत लंगरे, योगेश पवार टीनू जगदाळे, आबा माळी,हार्दिक खिलोसिया, बंटी ठक्कर, अतूल सणस ,प्रसाद जानवे ,वस्तल शाह  शूभम वैष्णव, शाम शर्मा ,मयूर भावसार, अरूण महाजन, भाऊ  मराठे,गोलू मुंडके ,भद्रेश शहा, गिरीश शहा,जयसिंग परदेशी,तेजेंद्र जामखेडकर आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button