खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेरात आणखी ४ रुग्ण आढळले पॉझिटिव्ह, मुंगसे येथील महिलेचा अहवाल निगेटिव्ह 

तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  झाली २७, त्यात ६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू 

अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील आणखी चार रुग्णांचा सोमवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७ झाली असून त्यात ६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे अमळनेर तालुक्यातील पहिली कोरोना पॉझिटिव्ह  मुंगसे येथील महिलेचा दुसरा अहवाल आणि ५५ वर्षीय महिलेचा १४ दिवसानंतरचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.
अमळनेर शहरातील संशयितांच्या सोमवारी आलेल्या अहवालात ३१, ४३, ६० वर्षीय महिला आणि ४८ वर्षीय व्यक्ति पॉझिटिव्ह आले आहेत. यात झामी चौकातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील २ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर २ नवीन रुग्णांचा समावेश झाला आहे. त्यात शहरातील एक डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करणाऱ्या बोरसे गल्लीतील व्यक्तीचा आणि कसाली मोहल्ल्यातील किडनीच्या आजार असलेल्या महिलेचा समावेश आहे. दोघांना लक्षणे दिसून आल्याने त्यांना कोविड सेंटरला दाखल केले होते. मात्र पॉझिटिव्ह निघताच त्यांना उपचारासाठी जळगाव रवाना करण्यात येणार आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आरोग्य कर्मचारी शोध घेऊ लागले आहेत.

महिलाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने अमळनेरसाठी दिलासादायक बाब 

अमळनेर तालुक्यात आढळून आलेली पहिली पॉझिटिव्ह मूंगसे येथील महिलेचा दूसरा अहवालही निगेटिव्ह आला आहे. महिलेचा १४ दिवसानंतरचा अहवालही निगेटिव्ह असून बुधवारी या महिलेला घरी सोडणार असल्याची माहिती मिळाली असून त्यांचे गावात जंगी स्वागत करणार असल्याचे समजते.
ग्रामिण भागातील महिला असल्याने शेतात राबून आणि घर काम करून इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग असल्याने त्यांच्या प्रकृतीची लवकरच सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button