खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

अमळनेर अर्बन बँकेने रेड झोनमध्ये उभारले निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी बँकेच्या उपक्रमाचे केले कौतुक

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या परिसरात जाण्यासाठी दि अमळनेर को.ऑफ.अर्बन बँकेने निर्जंतुकिकरण प्रवेशद्वाराची निर्मिती केली आहे. याचे अमळनेरच्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
शहरातील झामी चौक, साळीवाडा, आम्लेश्वरनगर, शाहआलमनगर रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात जाण्यासाठी प्रशासनाने पन्नालाल चौक येथे एकच प्रवेश ठिकाण करण्यात आले आहे. या ठिकाणी दि अमळनेर को.ऑफ.अर्बन बँकेच्या सौजन्याने तज्ञ डॉक्टर व आरोग्य विभागाचा मार्गदर्शनाने निर्जंतुकिकरण प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली आहे. हे प्रवेशद्वार लोकांसाठी आज माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, बॅँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, मॅनेजर अमृता पाटील, संचालक लालचंद सैनानी, शांताराम ठाकूर, प्रवीण जैन, प्रदीप अग्रवाल, अभिषेक पाटील, भरत ललवाणी, बाळासाहेब संदानशीव, पंकज चौधरी, कर्मचारी प्रवीण सातपुते, अवीनाश जाधव, किरण बागुल , विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खुले करण्यात आले. बॅँकेचा ह्या कार्यानिमित्त मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button