खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेरातील तीन कोरोना संशयित रुग्णांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात केले रवाना

तालुक्याच्या सीमा पूर्णपणे सील करण्याची काटेकोर कारवाई करण्याच्या दिल्या सूचना

अमळनेर(प्रतिनिधी) शहरातील आज पैलाड , तांबेपुरा  आणि अमलेश्वरनगर मधील तीन कोरोना संशयित रुग्णांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.  वेगाने  वाढत चाललेला संसर्ग हा बाहेरून येणाऱ्यांमुळे होत असल्याचे निदर्शनास आले असल्याने तालुक्याच्या सीमा पूर्णपणे सील करण्याची काटेकोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्याकडून  देण्यात आल्या आहेत.
अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या चार झाली आहे.  दोघांचा मृत्यू झाला आहे. वेगाने  वाढत चाललेला संसर्ग हा बाहेरून येणाऱ्यांमुळे होत असल्याचे निदर्शनास आले असल्याने तालुक्याच्या सीमा पूर्णपणे सील करण्याची काटेकोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  येणाऱ्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अपडावून देखील बंद करण्यात आले आहे. चोरट्या मार्गावरील वाटा, कोणत्याही पद्धतीने बंद करून कोणासही येण्याजण्यास बंद करून जनतेने स्वतः लक्ष घालून स्वतःच्या आणि आपल्या गावाची सुरक्षा करण्याचे आवाहन करण्यफ आले आहे.

सतत १४ दिवस चार हजार घरांचा सर्व्हे

सतत १४ दिवस चार हजार घरांचा सर्व्हे होणार आहे. पहिल्या दिवशी १०२० घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे.  त्यात ४ ते ५ सर्दी पडसे ताप असे रुग्ण आढळून आले. त्यांना औषध देऊन घरातच कोरोंटाईन केले आहे. कंटेन्मेंट झोन वाढवण्यात आला असून सर्वत्र बॅरॅकेट्स टाकून त्या भागातील लोकांना गावात येण्यास सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिल्या सूचना

दुसऱ्या दिवशी जिल्हा शल्य चिकित्सक एन. एस. चव्हाण यांनी भेट देऊन प्रांताधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ ,  वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी , डॉ. विलास महाजन यांच्याशी बैठकीत चर्चा करून कोरोनावर नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत सूचना केल्यात.

कोरोणाबाधीत महिलेच्या संपर्कातील तिघांचे अहवाल निगेटिव्ह 

दि. २० ते २२एप्रिल या कालावधीत कोविड-१९ रूग्णालय, जळगाव येथे घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रूग्णांपैकी ८ व्यक्तींच्या स्वॅबचे तपासणी अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अमळनेरातील कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कातील तीन व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button