अमळनेर (प्रतिनिधी) क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंचतर्फे महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह दर्शना पवार लिखित पुस्तिका वाचन आणि भेट देऊन महिला पदाधिकारीकडून शनिवारी सुरू करण्यात आला.
क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे ११ एप्रिल राष्ट्रपिता जोतिबा फुले ते १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सप्ताह घरी राहूनच महापुरुषांच्या पुस्तिका ग्रंथ वाचनाने राबवण्यात येत आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीपासून लेखिका दर्शना अरुण पवार यांच्या फुले दाम्पत्य यांच्या जीवन कार्यावर लिखित सावित्रीमाईचा जन्मोत्सव पुस्तिका वाचन करून प्रारंभ करण्यात आला.